ही तर युती सरकारच्या दमदार कामगिरीची सुरूवात - आ. विखे

आ. राधाकृष्ण विखे पाटील
आ. राधाकृष्ण विखे पाटील

लोणी |वार्ताहर| Loni

पेट्रोल आणि डिझे वरील करामध्ये कपात करण्याचा निर्णय करून सरकारने जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. ही तर युती सरकारच्या दमदार कामगिरीची सुरूवात असल्याची प्रतिक्रिया आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पेट्रोल पाच रुपयांनी आणि डिझेल तीन रुपयांनी स्वस्त होणार असल्याचे आ. विखे पाटील म्हणाले.

मागील अडीच वर्षे राज्यात आघाडी सरकार सत्तेवर होते. पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून त्यांनी जनतेला दिलासा द्यायला हवा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अनेक राज्यांनी कर कपात करण्याचा निर्णय केला होता. परंतु केवळ केंद्र सरकारच्या नावाने टाहो फोडणार्‍या आघाडी सरकारने आपली जबाबदारी झटकण्याचे काम केल्याने सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात संतप्त भावाना होत्या. नव्याने आलेल्या युती सरकारने थेट निर्णयाची अंमलबजावणी करून दाखवली असल्याचे आ.विखे पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात याबाबतच्या केलेल्या घोषणेवर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याने राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आ. विखे पाटील यांनी सांगितले.

राज्यात स्थापन झालेले सरकार हे जनतेच्या मनातील असल्याने त्यांच्या हिताचेच सरकार निर्णय करेल. केंद्रात आणि राज्यात एका विचारांचे सरकार असल्याने सहकार्याचे नवे पर्व राज्यात सुरू झाले आहे. सबका साथ सबका विश्वास आणि सबका विकास या न्यायाने लोकाभिमुख काम करून सरकार दमदार कामगिरी करेल, असा विश्वास आ. विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com