गोदावरी लाभक्षेत्रातील ओव्हर फ्लोचे पाणी कालव्यांना उपलब्ध करून द्यावे - आ. विखे

गोदावरी लाभक्षेत्रातील ओव्हर फ्लोचे पाणी कालव्यांना उपलब्ध करून द्यावे - आ. विखे
आ. राधाकृष्ण विखे पाटील

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

गोदावरी (Godavari) लाभक्षेत्रातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई (Drinking water scarcity) दूर करण्यासाठी ओव्हर फ्लोचे (Over Flow) पाणी कालव्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी जलसंपदा विभागाकडे (Department of Water Resources) केली आहे.

यासंदर्भात विभागाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती अलका अहिरराव यांना आ.विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) पत्र दिले असून लाभक्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नसल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. पावसा अभावी ओढे नाले पाझर तलावही कोरडेच असल्याने गावपातळीवर शेतकर्‍यांकडून पाण्याची मागणी वाढली असल्याची बाब आ.विखे (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी जलसंपदा विभागाच्या (Department of Water Resources) निदर्शनास आणून दिली आहे.

सद्य परिस्थितीत गोदावरी धरण समूहाच्या वरच्या भागात चांगला पाऊस झाल्याने धरणातून अतिरीक्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.हे पाणी लाभक्षेत्रातील कालव्यांना उपलब्ध करून दिल्यास पिकांना त्याचा लाभ होवून आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होवून शेतकर्‍यांना दिलासा मिळेल, त्यामुळेच ओव्हर फ्लोचे पाणी (Over Flow Water) कालव्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी आ.विखे (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com