पॉवरफुल्ल इंजिनलाच आमचा डबा जोडणार !

आ. विखेंच्या कोपरखळीला माजी आ. मुरकुटेंचे उत्तर
पॉवरफुल्ल इंजिनलाच आमचा डबा जोडणार !

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

‘तुम्ही तुमचा डबा नेमके कोणाला जोडायचा हे ठरवा‘ आम्हाला जोडला तर फायदाच होईल, अशी कोपरखळी आमदार राधाकृष्ण विखे (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे (Former MLA Bhanudas Murkute) यांना मारली. त्याला मुरकुटे (Former MLA Bhanudas Murkute) यांनीही त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. ‘जे इंजिन पॉवरफुल्ल असेल त्यालाच आम्ही आमचा डबा जोडणार’ असे मुरकुटे (Former MLA Bhanudas Murkute) म्हणताच उपस्थितांमधून हश्याचे फवारे उडाले.

राजकारणात (Political) कोणीही कुणाचा कायमचा मित्र अन् शत्रू नसतो. विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) मैत्री तर जिल्हा बँक निवडणुकीनंतर (District Bank Election) एकमेकांचे विरोधक झालेले माजी आमदार भानुदास मुरकुटे (Former MLA Bhanudas Murkute) व आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आले. आ. विखे (MLA Radhakrishna Vikhe Patil) श्रीरामपूरच्या (Shrirampur) दौर्‍यावर आले की येथील राजकारणावर ते हमखास बोलणार. त्यात हजर जबाबी असलेले व कधी मित्र तर कधी विरोधकांची भूमिका बजावणारे माजी आमदार भानुदास मुरकुटे शांत कसे बसणार?

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जुळून आलेल्या राजकीय समिकरणात आ. विखे व माजी आ. मुरकुटे यांची युती झाली होती. त्यानंतर अनेक कार्यक्रमात ते एकत्रित दिसत होते. यापुढील सर्व निवडणुका एकत्रित लढवण्याचेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार मुरकुटे हे ना.बाळासाहेब थोरातांच्या सहकार्याने बिनविरोध संचालक झाले. त्यामुळे दोघांची सहमती तुटली.

या वितुष्टानंतर परवाही दोन्ही नेतेमंडळी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आले. त्यावेळी माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणाले, विखे आणि थोरात दोघेही धोरणी आहेत. आपण आमदार डॉ. सुधीर तांबे (MLA Sudhir Tambe) यांना आमदार विखे यांच्या विरोधात शिर्डी मतदार संघात (Shirdi constituency) उभे करण्याचा आग्रह धरला होता तर विखे यांनाही श्रीरामपुरात सक्षम उमेदवार देण्याची मागणी केली होती.

मात्र दोघांनीही सावध भूमिका घेतली. असे मुरकुटे म्हणताच आमदार राधाकृष्ण विखे यांनी ‘तुमचा डबा नेमका कोठे जोडायचा’ हे अगोदर ठरवा. आम्हाला जोडला तर फायदाच होईल अशी कोपरखळी मारली.त्यावर ‘आपणही सावधपणे ज्यांचे इंजिन जास्त पावरफुल असेल त्याला आपला डबा जोडू’ असे मिश्कील उत्तर आपल्या खास शैलीत माजी आ. मुरकुटे यांनी दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com