महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सरकारची पत ढासळली- आ. विखे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाशिवाय देशाला पर्याय नाही
महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सरकारची पत ढासळली- आ. विखे

बेलापूर |वार्ताहर| Belapur

राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सरकारची पत ढासळली.त्यामुळे कोणी गुंतवणूकदार राज्यात यायला तयार नाहीत. राज्याला कोणीही लस द्यायला तयार नव्हते. महाराष्ट्रात अधिकार्‍यांच्या बदल्यांचे टेंडर काढले जातात .तसेच दरपत्रकच तयार केले आहेत. राज्याची एव्हढी बिकट अवस्था कधीच झाली नव्हती. करोनाच्या महाभयंकर संकटात राज्य सरकारचे योगदान काय? असा सवाल भाजपचे नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

जि. प.आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद नवले यांच्या निधीतून बेलापूर येथे पावणेतीन कोटी खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण आ. विखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शरद नवले होते.

आ. विखे पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नैतृत्वाखाली 120 कोटी जनतेचे निःशुल्क लसीकरण करण्यात आले. करोनाच्या काळात 1 लाख 60 हजार कोटी खर्च करुन गोरगरिबांना मोफत धान्य देऊन त्यांची भुक भागविली.काश्मीरसह देशभर पंचायत राजच्या माध्यमातून गावागावांत विकास करण्यासाठी तसेच वंचित भागांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धाडसी पाऊले टाकली जात आहेत.त्यामुळे यापुढे नरेंद्र मोदींच्या नैतृत्वाशिवाय देशाला पर्याय नाही, असेही विखे म्हणाले.

शरद नवले यांनी मिळालेल्या संधीचे सोने करीत चांगले काम करुन एक नवा अध्याय रचला असे सांगत आ. विखे यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. गावाच्या प्रस्तावित विकास कामांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही आ. विखे यांनी दिली. केंद्रीय ग्रामविकास मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत येत्या 5 मे रोजी बेलापूरला कार्यक्रम घेण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात शरद नवले म्हणाले की, पक्षभेद विसरून समविचारी लोकांना बरोबर घेऊन जनतेच्या विश्वासाला पात्र राहुन निवडणूक जाहीरनाम्यानुसार विविध विकासकामे पुर्ण करीत आहोत.पुढील काळात 12 कोटींची पाणी योजना,50 लाखांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,25 लाखांची अद्यावत जिम आणि कम्युनिटी हॉल, प्रवराकाठी पर्यटन विकास आदी प्रस्तावित कामांसाठी सहकार्य करण्याची विनंती आ. विखेंना केली.

गावातील विविध क्षेत्रातील शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सहकार क्षेत्रातील सुयश आणि कार्याबद्दल मान्यवरांचा विखेंच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी माजी सभापती दिपक पटारे यांनी विखेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. तसेच आमदारांना जमणार नाही असे काम नवलेंनी केल्याचा उल्लेख केला. सुनील मुथा यांनी दिवंगत खा. पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्याप्रमाणेच आपण बेलापूरकडे लक्ष देण्याची विखेंना विनंती केली. सरपंच महेंद्र साळवी यांनी स्वागत केले तर उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी प्रास्ताविक केले. शेवटी प्रफुल्ल डावरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन देविदास देसाई यांनी केले.

याप्रसंगी सर्वश्री नानासाहेब शिंदे, बाळासाहेब तोरणे, जि. प. सदस्या संगीताताई गांगुर्डे, गिरीधर आसने, गणेश मुदगुले, भीमभाऊ बांद्रे, अनिल थोरात, सुवालाल लुंकड, कनजीशेठ टाक, इस्माईल शेख, जाफरभाई आतार, पुरुषोत्तम भराटे, पोलीस पाटील अशोक प्रधान, लहानुभाऊ नागले, रणजित श्रीगोड, गटविकास अधिकारी मच्छीन्द्र धस, उपअभियंता आर. एस. पिसे, शाखा अभियंता गोराडे, बेलापूर खुर्दच्या सरपंच वर्षा महाडीक, उपसरपंच अ‍ॅड. दीपक बारहाते, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तगरे, ग्रा. पं. सदस्य रमेश अमोलिक, चंद्रकांत नवले, मुश्ताक शेख, वैभव कुर्‍हे, प्रियंका कुर्‍हे, स्वाती अमोलिक, तबसुम बागवान, उज्वला कुताळ, मिना साळवी आदींसह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.