विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड; राहाता तालुक्यात जल्लोष!

विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड; राहाता तालुक्यात जल्लोष!

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्री निवड झाली. राहाता तालुक्याला पुन्हा लाल दिवा मिळाल्याने ठिकठिकाणी तालुक्यात जल्लोष करण्यात आला.

भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा शिर्डी मतदार संघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिंदे - फडणवीस मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. दूरचित्रवाहिन्या व सोशल मीडियावर याची माहिती मतदार संघातील जनतेला मिळाली. याशिवाय आमदार विखे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार हे निश्चित होते. मतदार संघाला पूर्ण खात्री असल्याने काल दिवसभर विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आला.

अस्तगाव

तालुक्यातील अस्तगाव येथे मारुती मंदिरासमोर विखे पाटील समर्थकांनी फटाके वाजवत व विखे पाटील यांच्या घोषणा देत लाडू तसेच पेढे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच नवनाथ नळे, माजी उपसभापती वाल्मिकराव गोर्डे, माजी सरपंच नंदकुमार गव्हाणे, केशवराव चोळके, कैलास तरकसे, ज्ञानदेव गोर्डे, अशोकराव नळे, पंचायत समितीचे माजी सभापती निवास त्रिभुवन, हौशीराम लोंढे, भास्कराव जेजुरकर, ज्ञानदेव जेजुरकर,बाबुराव लोंढे, रविंद्र जेजुरकर, राजेंद्र पठारे, पंकज गोर्डे, संतोष गोर्डे, काशिनाथ जेजुरकर, अनिल नळे, ज्ञानदेव चोळके, भानुदास गवांदे, रवींद्र नळे, सूर्यभान गोर्डे, हेमंत गोर्डे, रियाज पठाण, अनिल देसाई, सागर गोर्डे, पुंडलिकराव तरकसे, इलाहिबक्स तांबोळी, नाना अष्टेकर, हौशीराम चोळके, अंबादास लोंढे, साहेबराव नळे, रावसाहेब सापते, चेतन चोळके, रंजन त्रिभुवन, नामदेव चोळके, दत्तात्रय जेजुरकर, पोपटराव त्रिभान, रवींद्र लोंढे, कैलास तरकसे, ठकाजी मोगले, सूर्यभान तरकसे, राजेंद्र चोळके, अमोल चौधरी, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केलवड

राहाता तालुक्यातील केलवड येथेही आमदार विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल जल्लोष करण्यात आला.याप्रसंगी बाजार समितीचे माजी संचालक सुनील गमे, काळू रजपूत, भारत राऊत, ज्ञानेश्वर वाघे, विकी जोर्वेकर, वाल्मिक गमे, बाळासाहेब राऊत, सुनील बढे, अमोल जटाड, नरेश गमे, शाम वाघे, आरणे, राहुल गोर्डे, भारत गमे, विशाल वाघे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत जल्लोष केला.

वाकडी

नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला व त्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून नुकताच शपथविधी सोहळा राजभवनात संपन्न झाला. त्याबद्दल वाकडी येथील जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांच्यावतीने एकमेकांना पेढे भरवून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

आनंद उत्सवात राजेंद्र लहारे कविता लहारे, अर्चना आहेर, बापूसाहेब लहारे, उपसरपंच सिंधू भालेराव, नारायणबाबा शेळके, अ‍ॅड. बाळासाहेब कोते, संदीप लहारे, पाराजी आहेर, अमित आहेर, सुरेश जाधव, अभय शेळके, राजेंद्र शेळके, विष्णूपंत लहारे, विठ्ठल भालेराव, सुरेश लहारे, विजय आहेर, कैलास आहेर, सुनील शेलार, संजय शेळके, महेश लांडे, बापू पवार, अविनाश खरात, शरद शेळके, अमोल जाधव, बाळासाहेब रखमा कोते, मच्छिंद्र खरात, जनार्धन लांडे, भारत शेळके, गणेश एलम, गोपीनाथ जाधव, सुधाकर बोरावके, केतन लहारे, राहुल कोते, सचिन लहारे आदी जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवडीने गणेश परिसराचा कायापालट होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. गोदावरी कालव्यांचे नुतनीकरण, रुंदीकरण ही कामे मार्गी लागतील. निळवंडेचे काम मार्गी लागतील. पद्मभूषण स्वर्गिय बाळासाहेब विखे पाटील यांच्या संकल्पनेतील पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे आणण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. यामुळे गणेश स्वयंपूर्ण होईल.

- मुकूंदराव सदाफळ, अध्यक्ष, गणेश कारखाना

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com