पाथर्डीचे सर्व क्षेत्र सिंचनाखाली आणणार - आ. प्राजक्त तनपुरे

 प्राजक्त तनपुरे
प्राजक्त तनपुरे

करंजी |प्रतिनिधी| Karanji

पाथर्डी तालुका नेहमी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो वांबोरी चारीच्या माध्यमातून या दुष्काळी भागाला मुळा धरणातून जास्तीत जास्त पाणी देण्याचा आपला प्रयत्न असून या पाण्याच्या माध्यमातून दुष्काळी क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.

जोहारवाडी परिसरात शेतकर्‍यांशी चर्चा करताना ते बोलत होते. येथील पाझर तलावात काराच्या नदीतून वाहून जाणारे पाणी पाईपलाईन द्वारे रस्त्याच्या कडेने सुमारे पाचशे फूट पाईपलाईन द्वारे सोडण्यासाठी संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून त्यावर देखील मार्ग काढू व जोहारवाडी खांडगाव परिसरातील शेतकर्‍यांचा पाणी प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. यावेळी मांडवे गावचे सरपंच राजेंद्र लवांडे, युवानेते विजय पालवे, बाळासाहेब पालवे, सरपंच अमोल वाघ, शिराळचे सरपंच रवींद्र मुळे, भोसे गावचे सरपंच विलास टेमकर, अशोक टेमकर, चेअरमन मच्छिंद्र सावंत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष जालिंदर वामन, अजय पाठक, शिवसेना नेते अनिल रांधवणे, राजेंद्र म्हस्के, सरपंच विक्रम जाधव, उपसरपंच अ‍ॅड गणेश शिंदे, मनोज म्हस्के, महेश लवांडे, भारत लवांडे, बालू लवांडे, गणेश पवार, अक्षय लवांडे, रामदास लवांडे, पिंटू जाधव, सचिन राठोड, संदीप लवांडे, तुषार जाधव, बंडू लवांडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com