विकासकामे रद्द केल्यास न्यायालयात जाणार

आ. तनपुरे यांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा
विकासकामे रद्द केल्यास न्यायालयात जाणार

तिसगाव |प्रतिनिधी| Tisgav

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही विविध विकास कामांना मंजूरी दिलेली आहे. त्यापैकी अनेक विकास कामे रद्द करण्याचे काम या ईडी सरकारने केले असून राहुरी मतदार संघातील पाच कोटी रुपयांचा निधी रद्द करण्याच्या प्रयत्न झाला आहे. या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला.

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी आमदार तनपुरे बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तिसगावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे होते. यावेळी आमदार तनपुरे म्हणाले, मी आमदार झाल्यापासून अडीच वर्षात विविध पिण्याच्या पाण्याच्या नळ योजनांसाठी प्राधान्याने निधी मंजूर करण्याचे काम केले. अनेक नळ योजनांना प्रशासकीय मंजुरी मिळवली यामध्ये बुर्‍हानगर प्रादेशिक नळ पाणी योजना असेल अथवा वांबोरी चारी टप्पा दोनची योजना असेल यांचा पाठपुरावा करून या योजनांसाठी प्रशासकीय मंजुरी आणली आणि टेंडर निघायच्या आत विरोधकांनी या योजनेच्या कामाचे भूमिपूजन ठेवून फुकटचे श्रेय लाटण्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे. याचाच अर्थ हे सरकार या नळ योजनेचे टेंडर काढेपर्यंत टिकणार की नाही याची बहुदा मंत्र्यांना खात्री नसावी. म्हणूनच भूमिपूजन करण्याचा प्रयत्न बहुदा झाला असावा अशा शब्दात आमदार तनपुरे यांनी बुर्‍हानगर नळ योजनेच्या भूमिपूजनावरुन विरोधकांवर निशाणा साधला.

यावेळी माजी सरपंच भाऊसाहेब लोखंडे, सरपंच अमोल वाघ, सुधाकर वांढेकर, कुंडलिक मचे, शिवाजी मचे, नितीन लोमटे, अजय पाठक, मन्सूर पठाण, भाऊसाहेब लवांडे, संजय लवांडे, अरुण पुंड, रफिक शेख, अंबादास शिंदे, शरद खंडागळे, काकासाहेब शिंदे, प्रदीप ससाने, अनिल ससाने, पप्पू सय्यद, सिकंदर पठाण, नजीर शेख, गफूर पठाण, चांद पठाण, राजू मौलाना, तिसगाव काँग्रेस शहराध्यक्ष समीर शेख, निसार पठाण, वहाब इनामदार शिक्षकनेते कल्याण लवांडे, महेश लोखंडे, अविनाश नरवडे, मुन्नाभाई पठाण, अशोक मुखेकर, सादिक पठाण, सुनील लवांडे, अकिल लवांडे, ग्रा.पं सदस्य तहशिरखा पठाण, लक्ष्मण जवणे, अमोल वाबळे, अर्षद शेख, राजु मौलाना, राजाराम गार्डे, डॉ, काशिनाथ ससाणे, ताराचंद लवांडे, जलाल पठाण, अकबर पठाण, भगवान गारुडकर, संभाजी गार्डे, सचिन लवांडे, हरिभाऊ गार्डे, शाखा अभियंता महेश पाटील, लक्ष्मण माने, ग्रामविकास अधिकारीभाऊसाहेब सावंत आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com