कर्जत |वार्ताहर|Karjat

स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा या स्पर्धेमध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये कर्जत नगरपंचायतचा समावेश असेल असा ठाम विश्वास मला वाटतो, असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी येथे केले.

वनमंत्री संजय राठोड व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रेरणेने राजमाता ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश तनपुरे यांनी कर्जत नगरपंचायत व सर्व सामाजिक संघटना यांना माझी वसुंधरा या स्पर्धेसाठी 1 हजार 111 झाडांचे वाटप आमदार रोहित पवार यांच्या हस्ते केले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, नगरसेवक सचिन घुले, मुख्याधिकारी गोविंद जाधव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, वनविभागाचे अधिकारी साबळे, व केदार, काकासाहेब तापकीर, अनिल तोरडमल, नितीन देशमुख, विशाल मेहत्रे, आशिष बोरा, सुनील शेलार, बापूसाहेब नेटके, काकासाहेब शेळके, तानाजी पाटील आदी उपस्थित होते.

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धे अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल, पिंपळवाडी येथील शिक्षक व सर्व सामाजिक संघटनांचे सदस्य सुनील भोसले यांनी कर्जत शहरातील बोलक्या भिंती व टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचा अभिनव उपक्रम राबवला. याबद्दल आ. पवार यांच्याहस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे संयोजक सामाजिक कार्यकर्ते महेश तनपुरे म्हणाले, आज झाडांची सर्वात मोठी गरज आपल्याला आहे. पर्यावरणाचा समतोल हा झाडांच्यामुळे राखला जातो. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले व मुख्याधिकारी गोविंद जाधव यांची भाषणे झाली. आभार सचिन घुले यांनी मानले.