आ. लंके यांनी कामचुकार अधिकार्‍यांना सुनावले

आ. लंके यांनी कामचुकार अधिकार्‍यांना सुनावले
आमदार निलेश लंके

पारनेर |प्रतिनिधी| Parner

विकास कामांच्या फाईल्स, कागदपत्रे पूर्ण होत नसतील तर काय उपयोग, तुम्ही काम करायचा पगार घेता, पदाधिकारी हा जनतेचा सेवक असतो जनतेची सेवा करताना काही प्रमाणामध्ये अडचणी येत असतात. या सर्व गोष्टी अधिकार्‍यांनी सांभाळून घ्यायच्या असतात अशा शब्दांत आ. लंके यांनी नगरपंचायतीच्या कामचुकार अधिकार्‍यांना खडे बोल सुनावले.

पारनेर येथे 5 कोटी 16 लाख 68 हजार रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी झालेल्या पारनेर ग्रामीण रुग्णालयात कार्यक्रमात आमदार लंके बोलत होते.

आ. लंके म्हणाले, मी काही तालुक्याचा भाग्यविधाता कार्यसम्राट नाही, पण मला काम करण्याची चांगली हातोटी आहे, असा टोमणा आ. लंके यांनी नाव न घेता माजी आमदार विजय औटी यांना मारला. पारनेरला 16 कोटी 64 लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात यशस्वी झालो असून पारनेरच्या शहरीकरणासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 25 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करणार असल्याचेही आमदार लंके यांनी सांगितले.

याप्रसंगी पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर, जितेश सरडे, राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख बाबाजी तरटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हा अध्यक्ष अर्जुन भालेकर, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे, युवती जिल्हा अध्यक्ष राजेश्वरी कोठावळे, गट विकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, नगरसेवक नीता औटी, प्रियंका औटी, अशोक चेडे, योगेश मते सुभाष शिंदे, भूषण शेलार, श्रीकांत चौरे, नंदकुमार औटी, किसन गंधाडे, नंदकुमार देशमुख, डॉ.मुदस्सर सय्यद, हसन राजे, धोंडिभाऊ पुजारी, बाळासाहेब औटी, विलास सोबले, सखाराम औटी, राजेंद्र चेडे , उमा बोरुडे, पाकीजा शेख, वैजंता मते, रा.या.औटी, बबन चौरे,बंडू गायकवाड आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.