आमदार लंके यांचे अद्यापही नरो वा कुंजरो वा

पारनेर येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा, भूमिका संदिग्ध
आमदार लंके यांचे अद्यापही नरो वा कुंजरो वा

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पवार कुंटुब व राष्ट्रवादी पक्ष एकसंघ रहावे अशीच आपली अपेक्षा आहे. मी राष्ट्रवादी पक्षाचा असुन पवार परीवारा बरोबर आहे. असे सांगत आमदार निलेश लंके यांनी त्यांची भूमिका स्पष्ट न करता संदिग्धच ठेवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने पारनेर येथील आनंद लॉन येथे राजकीय घडामोडी व आगामी निवडणुकांवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी (दि.3) बुथ कमिटी आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी आ. लंके बोलत होते.

राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. सध्याच्या घडामोडी पाहता आपण राजकारण सोडून द्यावे की काय अशी अवस्था झाली आहे. राजकारण अभिमन्यू सारखे झाले असून हा परिवार एक राहिला पाहिजे. हा परिवार महाराष्ट्राचे हित जपणारा व विकासाला दिशा देणारा आहे. त्यामुळे मला काही मिळाले नाही तरी चालेल. परंतु महाराष्ट्र, देशाच्या हितासाठी पवार कुटुंबिय राजकारणात राहिले पाहिजे. असे आमदार नीलेश लंके म्हणाले. राजकारणात आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहोत. खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या बरोबर असून राजकारणात कुठलाही निर्णय घेतला तरी मान्य होतो की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे.

आमदार लंके म्हणाले, काही दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लागु शकतात. त्यामुळे रात्रीतून काही होवू शकते, हे राजकीय घडामोडीतून दिसून येत आहे. मतदारसंघात 365 बुध असून प्रत्येकाचा अभ्यास केला आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी कोणत्याही प्रकारची निवडणूक लागली तरी सामोरे जाता आले पाहिजे. सर्व घटकांवर जबाबदारी सोपवून सुक्ष्म नियोजन केल्यास त्याचा फायदा सर्वच निवडणुकांत होऊ शकतो.

यावेळी सभापती तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाबाजी तरटे, नगराध्यक्ष नितीन अडसुळ, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, अशोक सावंत, प्रशांत गायकवाड, उपसभापती बापूसाहेब शिर्के, सुदाम पवार, बाळासाहेब खिलारी, गंगाराम बेलकर, डॉ. खोडदे, संदीप सालके, विजय पवार, श्रीरंग रोकडे, राहुल झावरे, दादा शिंदे, कारभारी पोटधन, मेजर वसंत कवाद, ठकाराम लंके, दीपक पवार, सचिन पठारे, शेळके, पारनेर नगरपंचायतचे सर्व आजी माजी सभापती व नगरसेवक खंडू भुकन, शिवाजी मोरे, भाऊसाहेब भोगाडे, सोमनाथ आहेर, रा. वा. औटी, बाळासाहेब खिलारी, संजय लाकुडझोडे, सुवर्णा धाडगे, वंदना गंधाक्ते, पुनम मुंगसे, दिपाली औटी, वैजयंता मते, मनिषा जाधव, संगीता दरेकर, पाकीजा शेख, कल्पना थोरात, विजय डोळ, नंद देशमुख, बंडू गायकवाड, बबलु रोहकले, सुनिल करंजुले, शिवा शिंदे, राजू शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com