बाजार समितीतही विरोधकांचे पानिपत करू- आ. लंके

सोसायटी पदाधिकार्‍यांचा मेळावा संपन्न
बाजार समितीतही विरोधकांचे पानिपत करू- आ. लंके

पारनेर |प्रतिनिधी| Parner

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विरोधकांचे पानीपत केले असून आगामी बाजार समितीच्या निवडणुकीतही विरोधकांना पाणी पाजू असा विश्वास आमदार निलेश लंके यांनी येथे व्यक्त केला.

जिल्हा सहकारी बँकेच्यावतीने पारनेर तालुक्यातील सेवा संस्थेच्या पदाधिकार्‍यांचा व सचिवांचा मेळावा पारनेर येथील गणेश मंगल कार्यालयात बुधवारी आयोजित करण्यात आला होता यावेळी आ. लंके बोलत होते.सहकार चळवळीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय शेळके व संचालक सभापती प्रशांत गायकवाड यांचे काम आदर्श असून सहकाराचा वारसा पुढे नेण्याचे काम हे दोघे करीत असल्याची कौतुकाची थाप आमदार लंके यांनी दिली.

यावेळी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर संचालक सभापती प्रशांत गायकवाड अशोक सावंत, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे ,बाजार संचालक शिवाजी बेलकर, संचालक सावकार बुचुडे ,लहु थोरात, अण्णा बढे, प्रदिप सोमवंशी, बाबाजी भंडारी, बी.एन.भालेकर, विक्रम कळमकर, किसनराव रासकर, जिल्हा बँकेचे टीडिओ इंद्रभान शेळके, सहायक निबंधक गणेश औटी, सोमनाथ वरखडे, सचिव संघटनेचे नेते दत्ता पतके, बापुसाहेब चंदन, रा.या.औटी, बबलु रोहकले, प्रदिप सोमवंशी खंडू भाईक, राजेंद्र शिंदे ,सरपंच राहुल झावरे, सखाराम औटी ,भागुजी झावरे, जालिंदर वाबळे, भागाजी गावडे, अशोक ढवळे, कार्यालयीन अधीक्षक प्रभाकर लाळगे, अमोल रेपाळे, राजू पठारे, गोकुळ लोंढे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

निवडणुकीचे फुंकले रणशिंग ?

आ. लंके यांनी या मेळाव्यात केलेले वक्तव्य हे पारनेर बाजार समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे चिन्ह असल्याचे बोलले जात आहे. सध्या बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात असून अनेकवेळा तोडफोडीचे राजकारण होऊनही आ. लंके व सभापती प्रशांत गायकवाड यांनी पाच वर्षे सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. यामुळे निवडणुकीत किती धुरळा उडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com