केंद्राने राज्यपालांना परत बोलवावे - आमदार लंके

शिवाजी महाराजांवरील वक्तव्याचा निषेध
आमदार निलेश लंके
आमदार निलेश लंके

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

राज्यपाल महाराष्ट्रातील महान व्यक्तींबाबात नेहमी वादग्रस्त विधान करून जनतेच्या भावना दुखावत आहेत. केंद्र शासनाने त्यांना परत बोलवावे अशी मागणी करत आ. निलेश लंके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढणार्‍या राज्यपालांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध केला.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ, लंके यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवराय, या शिवरायांबद्दल राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदीने छत्रपती शिवरायांबद्दल केलेली वक्तव्य क्षमा योग्य नाहीत.

महाराष्ट्रातील तमाम जनता छत्रपती शिवरायांबद्दल चे चुकीचे वक्तव्य कधी सहन करणार नाही. तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com