गोदावरी खोर्‍यात नवीन प्रकल्प नाकारने अन्यायकारक - आ. लंके

शासन निर्णय सुधारीत करण्याची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी
आमदार निलेश लंके
आमदार निलेश लंके

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

गोदावरी खोर्‍यात जायकवाडी धरणाच्या वर नवीन प्रकल्प हाती न घेण्याचा शासन निणर्य पारनेर - नगर मतदार संघासाठी अन्यायकारक आहे. किमान 3.5 दशलक्ष घनफुट पर्यंत पाणी साठवण क्षमता असलेल्या साठवण बंधारे, सिमेंट बंधारे तसेच कोल्हापूर पध्दतीच्या बंधारे बांधण्यासाठी शासनाचा पूर्वीचा निर्णय सुधारीत करण्याची मागणी आमदार नीलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

लंके यांनी फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, गोदावरी खोर्‍यामध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या वरील बाजूस कोणतेही नविन प्रकल्प हाती न घेण्याबाबत जनहित याचिकेच्या अनुषंगाने शासनाने परीपत्रक जारी केले आहे. गोदावरी खोर्‍यात व जायकवाडी प्रकल्पाच्या वरील बाजूस कोणतेही नवीन प्रकल्प घेऊ नये असे आदेशित करण्यात आले आहे. परंतु पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघातील कायमस्वरूपी दुष्काळी गावांतील शेतकर्‍यांना छोटे सिमेंट बंधारे, साठवण तलाव तसेच कोल्हापुर पध्दतीच्या बंधार्‍यांशिवाय पाण्याचा कोणताही स्त्रोत नाही.

अशा शेतकर्‍यांसाठी हे शासन परिपत्रक अन्यायकारक आहे. जायकवाडी प्रकल्पातील पाण्यामध्ये तुट निर्माण होईल असे लघु, मध्यम व मोठे पाटबंधारे प्रकल्प हाती घेऊ नयेत परंतू 3.50 दशलक्ष घनफुट पर्यंत पाणी साठवण क्षकता असलेले साठवण बंधारे, सिमेंट बंधारे तसेच कोल्हापूर पध्दतीचे बंधारे या कामांसाठी शासन निर्णय रद्द करण्यात यावा. व जायकवाडी प्रकल्पाच्या वरील बाजूस 3.50 दशलक्ष घनफुट पर्यंत साठवण क्षमता असलेल्या जलसंधारणाच्या कामांना मान्यता देण्याबाबत शासन निर्णय सुधारीत करण्यात यावा अशी मागणी आ. लंकेे यांनी या निवेदनात केली आहे.

प्रमाणपत्र घेणे अनिवार्य

3.50 दशलक्ष घनफुट क्षमतेपेक्षा जास्त साठवणूक क्षमता असलेल्या सर्व योजनांना नाशिक येथील नियोजन व जल विज्ञान विभागाचे मुख्य अभियंता यांचे प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र या क्षमतेच्या प्रकल्पांसाठी हे अन्यायकारक असल्याचे आ. लंके यांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com