आ. लंकेंनी अंथरुण, पांघरूण सांभाळावे लोकसभेचा नाद सोडावा

माजी आमदार झावरेंचा वडिलकीचा सल्ला
आ. लंकेंनी अंथरुण, पांघरूण सांभाळावे लोकसभेचा नाद सोडावा

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

आमदार निलेश लंके तुम्ही आर. आर. पाटलांसारखे महाराष्ट्रात काम करा. त्यांच्यासारखे व्हा, परंतु आपले अंथरूण, पांघरूण सांभाळा आणि लोकसभेचा नाद सोडा असा वडिलकीचा सल्ला माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी दिला. आ. लंके यांना लोकसभेसाठी प्रोजेक्ट करण्याचे एकीकडे राष्ट्रवादीचे प्रयत्न असतानाच दुसरीकडे लंके यांना पारनेरमध्ये साथ देणारे ज्येष्ठ नेते झावरे यांनी वेगळ्या शब्दांत कान फुंकल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

टाकळीढोकेश्वर येथे एका कार्यक्रम प्रसंगी लंके व माजी आमदार नंदकुमार झावरे एकाच व्यासपीठावर असताना त्यांनी हा सल्ला दिला. यावेळी माजी सभापती राहुल झावरे, प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, विश्वस्त सीताराम खिलारी, माजी सभापती गंगाराम बेलकर, मारूती रेपाळे, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र पाटील, दूध संघाचे अध्यक्ष संभाजी रोहकले, जिल्हा परिषद सदस्या पुष्पा वराळ, सरपंच अरुणा खिलारी, उपसरपंच सुनील चव्हाण, प्राचार्य डॉ. लक्ष्मण मतकर, दादाभाऊ सोनावळे, शैलेंद्र औटी, राजेंद्र चौधरी, सरपंच राहुल झावरे, सचिन अप्पा पठारे, सरपंच प्रकाश गाजरे, सरपंच अप्पासाहेब शिंदे, बाळासाहेब खिलारी, सचिन पठारे, दत्तात्रय निवडूंगे, दत्तात्रय कोरडे, भागुजी झावरे, जालिंदर वाबळे, पो. द. साळुंके, किरण ठुबे, रामा तराळ, भाऊसाहेब झावरे, शूभम गोरडे, महेश झावरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

झावरे म्हणाले, पारनेर विधानसभा मतदारसंघात आ. लंके यांचे चांगले काम आहे. तालुक्यातील जनतेला व प्रश्नांना जर न्याय द्यायचा असेल तर तालुक्यातच काम करा. पारनेर तालुक्यातून मोठे राजकीय भवितव्य आहे. जनतेचा कौल मान्य करा, असेही माजी आमदार झावरे म्हणाले. आ. लंके म्हणाले, माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी विधानसभा निवडणुकीत एक सामान्य कुटुंबातील सदस्य असताना मदत केली आहे. त्यांनीच सुपा औद्योगिक वसाहतीत बेरोजगार तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

काहीजण आमावस्या-पौर्णिमेला बाहेर येतात

तालुक्यातील काही जण आमावस्या-पौर्णिमेला बाहेर येतात, सल्ला देतात आणि निघून जातात, असे सांगत नाव न घेता आ. लंके यांनी माजी आमदार विजय औटी यांच्यावर टीका केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com