राजकारण करून संस्थांचे वाटोळे करणारांना घरी बसवा - आ. राजळे

राजकारण करून संस्थांचे वाटोळे करणारांना घरी बसवा - आ. राजळे

पाथर्डी |तालुका प्रतिनिधि| Pathardi

अनेक जणांच्या, अनेक दिवसांच्या कष्टातून एखादी संस्था नावारूपाला येते.तीच संस्था आपल्या डोळ्यादेखत डबघाईला येते. एखादा निर्णय चुकला तर काय होते हे आपण बाजार समितीमध्ये अनुभवले आहे. गेली पाच वर्षे बाजार समितीमध्ये कसा कारभार केला.काय दिवे लावले चांगल्या संस्थेचे वाटोळे कसे केले हे तुम्ही पाहिले. जनतेची कामे न करता फक्त राजकारण करून संस्थांचे वाटोळे करणारांना आगामी निवडणुकांत घरी बसवा, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी येथे केले.

तालुक्यातील काळेवाडी, हाकेवाडी, कळसपिंप्री व जवखेडे खालसा येथे जिल्हा नियोजन समीती, नाबार्ड व आमदार स्थानिक विकास निधीतुन सुमारे अडीच कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आ.मोनिका राजळे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री व गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज होते हे होते. तर भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा काशी गोल्हार, सभापती गोकुळ दौंड, पंचायत समीती सदस्य सुनील ओव्हळ, सुभाष केकाण, अजय रक्ताटे, भगवान साठे, मोहज देवढेच्या सरपंच अर्चना हाके, माजी सरपंच गणेश चितळकर, अजित देवढे, लक्ष्मण काळे, बाळू पडळकर, रामभाऊ वाघमोडे, नामदेव काळे, अशोक रुपनर, दत्तू काळे, बबन काळे, भिवाजी काळे, दादा रुपनर, महादेव जायभाये, सुधाकर भवार, ह.भ.प. लक्ष्मण महाराजभवार, कळसपिंप्रीचे सरपंच दिगंबर भवार, उपसरपंच नितीन भवार, नवनाथ भवार, गहिनाथ बोंद्रे, जगन्नाथ घुगरे, अशोक कांजवणे, सचिन पालवे, राजेंद्र साप्ते, बाळासाहेब गोल्हार, नारायण काकडे, बाबासाहेब किलबिले आदी प्रमुख उपस्थित होते.

आ.राजळे म्हणाल्या, आमदार निधी वाटपात भेदभाव केला जातो. महाविकास आघाडी सरकार फक्त घोषणा करते. शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी वीज बील वसुलीसाठी शेतीपंपाची वीज तोडली जात आहे. दोन वर्षे झाले तरी शासकीय समित्या सुध्दा करता आल्या नाहीत. प्रत्येक वेळेस केंद्र सरकारकडे बोट दाखविले जाते. आशा या शेतकरीविरोधी महाविकास आघाडी सरकारला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जनता जागा दाखवेल, असेही त्या म्हणाल्या. कार्यकमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गोविंद रुपनर यांनी केले तर बाळासाहेब पडळकर यांनी आभार यांनी मानले.

जनता पाठिशी, भीती नाही..

थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मला अनुभव नाही मी पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. मी एकटी आहे. आता मला तुमची साथ हवी आहे असे आवाहन आ. राजळे यांनी आपल्या भाषणातून केले.तो धागा पकडत महंत ह.भ.प.आदीनाथ शास्त्री म्हणाले, तुम्ही एकट्या नसून मतदार संघातील सर्व जनता तुमच्याबरोबर आहे. तुम्ही वाघीण आहात. अनेक वर्षे या मतदार संघाला तुमची गरज आहे.जनतेचे आशिर्वाद कायमच तुमच्यासोबत असल्याने तुम्हाला कशाचीच भीती नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com