विकास कामांचे फुकटचे श्रेय लाटू नये - आमदार राजळे

नाव न घेता डॉ. घुले यांना उपरोधिक टोला
विकास कामांचे फुकटचे श्रेय लाटू नये - आमदार राजळे
आमदार मोनिका राजळे

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

विरोधकांनी दुसर्‍यांनी पाठपुरावा केलेल्या विकास कामाचे फुकटचे श्रेय घेऊ नये आपली क्षमता दाखवावी, असा उपरोधीक टोला आ. मोनिका राजळे यांनी सभापती डॉ.क्षितिज घुले यांचे नाव न घेता जोरदार लगावला आहे.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे विकास कामांच्या पाहणीनंतर त्या बोलत होत्या. आ. राजळे म्हणाल्या, आपण मतदारसंघात अतिवृष्टी झाल्याने तातडीने भागात दौरा करून पूरग्रस्तांना दिलासा देण्याचे काम केले. तातडीची भरीव मदत मिळण्यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला त्यामुळे शेवगाव तालुक्यात 16 कोटी 35 लाख रुपये नुकसानग्रस्तांसाठी भरीव मदत निधी मंजूर झाला आहे. पूरग्रस्तांना तातडीची म्हणून 12 गावांत 5 कोटी 99 हजार 450 रुपयांचा निधी दीपावली पूर्वी देण्यासाठी प्रयत्न आहे.

परंतु विरोधकांना निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत, आम्ही पाठपुरावा करून मंजूर केलेल्या विविध कामांचे श्रेय निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. खासदार, आमदार, व इतरांचे कामे व निधीची मर्यादा किती आहे हे सर्वश्रूत आहे. त्यामुळे श्रेय लाटणार्‍या विरोधकांनी आपली पदाची क्षमता ओळखून विकासाच्या वल्गना कराव्यात, असा उपरोधीक सल्ला आ.मोनिका राजळे यांनी शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ क्षितिज घुले यांचे नाव न घेता जोरदार टीका केली.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष आशाताई गरड, माजी जि.प. सदस्य नितीन काकडे, बापूसाहेब पाटेकर, संचालक बाळासाहेब गोल्हार,बोधेगावचे सरपंच सुभाष पवळे, शिवाजी बापू पवार,कासम शेख, भीमराज सागडे, राजेंद्र डमाळे, रामनाथ भागड, भगवान खुरमुरे, दत्तात्रय शिंदे, विक्रम बारवकर, ज्ञानदेव घोरतळे, नवनाथ भवार, संदीप देशमुख, विश्वनाथ घोरतळे, विश्वनाथ कुढेकर, अशोक बाणाईत, संजय काशीद, अशोक गाडे, काशिनाथ चेमटे, लक्ष्मण देवढे, विक्रम देशमुख, सुरेश नेमाने, मयूर हुंडेकरी, बबन घोरतळे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी जि.प. सदस्य नितीनराव काकडे, भीमराज सागडे, परमेश्वर तांबे यांची भाषणे झाली सूत्रसंचालन संतोष केसभट यांनी केले आभार परमेश्वर तांबे यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com