शेतकर्‍यांना दर्जेदार व आवश्यक खते व बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करा

आमदार मोनिका राजळे यांच्या कृषी विभागाला सुचना
शेतकर्‍यांना दर्जेदार व आवश्यक खते व बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

गेली दोन वर्ष करोना (Corona) व अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) तालुक्यातील शेती पिकांचे (Crops) मोठे नुकसान (Loss) झाल्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थीक संकटात (Financial Crisis) सापडला आहे. यावर्षी तालुका कृषी विभागाने (Department of Agriculture) योग्य नियोजन करून तालुक्याची गरज लक्षात घेऊन आवश्यक असणारी मागणी करून शेतकर्‍यांना मुबलक प्रमाणात उच्च प्रतीचे चांगल्या कंपन्याचे दर्जेदार खते (Fertilizers), बी बियाणे (Seeds) उपलब्ध करून द्यावीत. तसेच साठेबाजी व कृत्रीम टंचाई होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सुचना आमदार मोनिका राजळे (MLA Monika Rajale) यांनी कृषी विभागाला (Department of Agriculture) दिल्या.

पंचायत समीतीच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृहात म्हाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने आयोजित खरीप हंगाम 2022-23 पुर्व नियोजन आढावा बैठकीत आ. राजळे (MLA Monika Rajale) बोलत होत्या. गेली दोन वर्ष नैसर्गिक आपत्ती, निर्सगाचा लहरीपणा व अतिवृष्टी पिकांवरील रोग यामुळे शेती पिकांसह शेतकरी, व्यापारी, कामगार या सर्वांचेच मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान (Crops Grant) मिळाले मात्र इतर नुकसान झालेले अनुदान अद्याप मिळाले नाही. जिल्ह्यात तालुका कृषी विभागाचे ऑनलाईनचे काम अत्यंत चांगले आहे.

तालुका कृषी अधिकारी व कृषी सेवा केंद्र चालकांनी विश्वासाने आपल्या दुकानात खरेदीसाठी आलेल्या शेतकर्‍यांना पिकांबाबत योग्य माहिती, मार्गदर्शन व सल्ला देऊन त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. येत्या महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी होणार्‍या ग्रामसभेत कृषी सहाय्याकांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांची माहिती शेतकर्‍यांना द्यावी. तालुक्यात जास्तीत कृषी फार्मर प्रोडयुसर कंपन्या स्थापन होण्यासाठी प्रयत्न करावेत.

शेतकर्‍यांनीही पारंपारिक शेतीऐवजी तंत्रज्ञानाचा वापर करून अधुनिक शेतीकडे लक्ष केंद्रीत करावे. कृषी गट स्थापन करून समुह शेतीच्या माध्यमातुन एकत्र येऊन बांबु शेती, मत्स्य शेती, फळप्रक्रिया, शेती पिके प्रक्रिया उद्योग सुरू करावे. ते अधिक फायदेशीर असल्याचे आ.राजळे यावेळी म्हणाल्या.

Related Stories

No stories found.