मोनिका राजळे
मोनिका राजळे
सार्वमत

आ. मोनिकाताई राजळे होम क्वारंटाईन

Arvind Arkhade

पाथर्डी|तालुका प्रतिनिधी|Pathardi

पाथर्डी-शेवगावच्या आमदार मोनिकाताई राजळे करोना पॉझिटिव्हच्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने 18 जुलैपासून होम क्वारंटाईन होत असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली.

पाथर्डी-शेवगावच्या आमदार राजळे या करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने जिल्हा शासकीय रुग्णालय अहमदनगर येथे घशाचा स्रावाचा नमुना घेऊन करोना टेस्ट घेण्यात आली. तेव्हापासून त्या होम क्वारंटाईन झाल्या आहेत. दरम्यान रात्री उशिरा साडेनऊ वाजता त्यांची करोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

परंतु त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मोनिका राजळे स्वतःच्या घरीच क्वारंटाईन झाल्या आहेत. आमदारांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com