आरोग्य सुविधांसाठी आमदार राजळेंचे नामदार टोपे यांना साकडे

पाथर्डी, शेवगावच्या आरोग्य सेवा सुधारण्याची मागणी
आरोग्य सुविधांसाठी आमदार राजळेंचे नामदार टोपे यांना साकडे

पाथर्डी |प्रतिनिधी|Pathardi

करोनाच्या तिसर्‍या लाटेचा पार्श्वभूमीवर ( Background to the third wave of the corona) सांभाव्य धोका (Potential danger) लक्षात घेऊन पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदार संघाच्या (Pathardi Shevgaon Assembly constituency) आमदार मोनिका राजळे (MLA Monik Rajale) यांनी मुंबई येथे राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांची भेट घेऊन पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील (Shevgav Taluka) करोनाची सद्यस्थितीबाबत माहिती देऊन आरोग्य सुविधा व उपाययोजना सुधारणांबाबत साकडे घातले.

गुरुवारी (दि.19) दुपारी मुंबई येथे राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांची राजळे (MLA Monika Rajale) यांनी भेट घेऊन चर्चा केली. यात उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी (Sub-District Hospital Pathardi) येथे नवीन पन्नास बेड मंजूर करून उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे (दर्जा वाढविणे), ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे नवीन पन्नास बेड मंजूर करणे, तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करणे, उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी व ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे व्हेंटिलेटरची संख्या व ऑक्सीजन प्लांटची क्षमता वाढविणे यासह पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र नव्याने मंजूर करून सध्या अस्तित्वात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात आरोग्याबाबत भौतिक सुविधा उपलब्ध करणे, वैद्यकीय आधिकारी, नर्स, कर्मचारी यांची रिक्त पदे तातडीने भरली जावीत.

तसेच कर्मचार्‍यांची संख्या वाढविण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. राज्याच्या आरोग्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील आरोग्य विषयक समस्या व उपाययोजना याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून पाथर्डी शेवगाव तालुक्यातील (Pathardi Shevgav) आरोग्याबाबतच्या सर्व मागण्यांची दखल घेऊन मार्गी लावण्याबाबत तातडीने प्रयत्न केले जातील असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी यावेळी सांगितल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी माहिती दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com