ना.गडाखांमुळे जलसंधारण कामांना वेग

सेना आमदार महेश शिंदे : मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली नाही
ना.गडाखांमुळे जलसंधारण कामांना वेग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जलसंधारण मंत्रालयाच्या कामकाजाबाबत कोणतीही तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली नसून नामदार शंकरराव गडाख यांनीच आपल्या मतदारसंघात जलसंधारणाची अनेक कामे मंजूर केली आहेत, असे स्पष्टीकरण सेना आमदार महेश संभाजीराजे शिंदे यांनी दिले आहे.

सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये रस्सीखेच आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. यावेळी आ.शिंदे यांनी जलसंधारण व ग्रामविकास मंत्रालय व या विभागाचे मंत्री यांच्याविरोधात तक्रार केल्याचे वृत्त ‘सार्वमत’मध्ये प्रकाशित झाले होते. मात्र आ.शिंदे यांनी याबाबत खंडण केले आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव-खटाव विधानसभा मतदारसंघाचे आ.शिंदे यांनी याबाबत पत्राद्वारे आपली भुमिका स्पष्ट केली आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्याकडे अपेक्षा व्यक्त करत असतो. अशीच अपेक्षा ग्रामविकास विभागाच्या निधीबाबत व्यक्त केली होती. त्याचा जलसंधारणाशी संबंध नाही. अवर्षण प्रवण कोरेगाव खटाव मतदारसंघासाठी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे मंजूर केली आहेत. याबाबत आपल्याकडून नाराजी किंवा तक्रारीचा कोणताही प्रकार घडलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, बुधवारी दिवसभरात मुंबईत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीतील घटक पक्ष व अपक्ष आमदार आघाडीसोबतच असल्याचा दावा नेत्यांकडून करण्यात आला. राज्यसभा निवडणूक राजकारणात महाविकास आघाडीने आपली बाजू मजबूत केल्याचे मानले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com