शासनाकडे पाठपुरावा करून शहरात नवीन पाण्याच्या टाक्या उभारू - आ. कानडे

शासनाकडे पाठपुरावा करून शहरात नवीन पाण्याच्या टाक्या उभारू - आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

पाण्याच्या टाक्यांची मुदत 25 वर्षांपूर्वी संपली असल्याने शासनाकडे पाठपुरावा करून नवीन पाण्याच्या टाक्या या भागात उभारुन देऊ, असे आश्वासन आ. लहु कानडे यांनी दिले.

माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी व माजी नगरसेवक राजेश अलघ यांनी आ. कानडे यांना मौलाना आझाद चौक व दशमेशनगर याठिकाणी नेऊन पाण्याच्या टाक्याची पाहणी केली. त्यावेळी आ. कानडे बोलत होते.

मौलाना आझाद चौक व दशमेशनगर येथील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या 1959 व 1970 साली लोड-बेरिंगमध्ये बांधण्यात आल्या आहेत. या टाक्यांच्या कामाची मुदत साधारण 35 वर्षे आहे. टाक्या बांधून 60 वर्षे होऊन गेली आहेत. मुदत संपून 25 वर्षे झाली आहेत. याबाबत शासनाकडे अनेक वर्षांपासून प्रस्ताव पडून आहेत. आता पिण्याच्या टाक्यांना जास्त प्रमाणात भेगा पडल्या असून कायम पाणी लिकेज होत आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निवासस्थान याच पिण्याच्या टाकीखाली असून या टाकीचे कधीही काहीही होऊ शकते.

या भीतीमुळे मुख्याधिकार्‍यांना दुसरीकडे भाड्याने घर घेऊन राहावे लागत असल्याचे तसेच टाकीच्या चारही बाजूने निवासस्थाने आहेत. दुर्दैवाने काही घडल्यास मोठी जिवीतहानी व शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचे श्री. गुलाटी व श्री. अलघ यांनी आ. कानडे यांच्या निदर्शनास आणून दिले.

नगर पालिकेकडून शासनाकडे याबाबत निधीसाठी प्रस्ताव पाठवले असून एमजीपीकडे प्रस्ताव पडून आहे. सदर प्रस्ताव त्वरित मंजूर होणे कामी आपण लक्ष घालून तातडीने या नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्याची विनंती रवींद्र गुलाटी व राजेश अलघ यांनी यावेळी केली. यास आ. कानडे यांनी सकारत्मकता दाखवत तातडीने यात लक्ष घालून नवीन टाक्या उभारु, असे सांगितले.

Related Stories

No stories found.