आमदार झालो हे तुमचे उपकार- आ. कानडे

उपकाराची फेड विकास कामांतून करणार
आमदार झालो हे तुमचे उपकार- आ. कानडे
आ. कानडे

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर मतदार संघात टाकळीभान हे दोन नंबरचे गाव असून निवडणुकीत टाकळीभानकरांनी भरभरून प्रेम केलेले आहे. त्यामुळेच आमदार झालो असून हे तुमचे उपकार आहेत. या उपकाराची फेड विकास कामातून करीत असून मतदार संघाचा कायापालट करणार आसल्याचे प्रतिपादन आ. लहू कानडे यांनी केले.

टाकळीभान येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी सरपंच मंजाबापू थोरात, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी सभापती नानासाहेब पवार, राहुल पटारे, अशोक कानडे, उपसरपंच कान्हा खंडागळे, जयकर मगर आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. लहू कानडे म्हणाले, टाकळीभानकरांनी निवडणुकीत भरभरून प्रेम दिलेले आहे. त्यामुळेच आमदार झालेलो आहे. श्रीरामपूरच्या विकासात दळणवळणाची सोय महत्त्वाची असल्याने बाभळेश्वर ते नेवासा या रस्त्याचे काम मार्गी लावले आहे. तालुक्यात विजेचा प्रश्न गंभीर असल्यामुळे 220 के व्ही वीज केंद्र तसेच घोगरगाव सब स्टेशन मंजूर केले आहे. गोरगरिबांना मोफत उपचार मिळावेत म्हणून श्रीरामपूर येथे उपजिल्हा रुग्णालय, ऑक्सिजन प्लँट, रुग्णवाहिका सुरू केलेली आहे.

टाकळीभान ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा योजनेला 24 तास विजपुरवठा सुरू राहावा या कामासाठी 17 लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे. यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे, माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे, जयकर मगर, मंजाबापू थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे यांनी तर सूत्रसंचालन भारत भवार यांनी केले. आभार प्रा.कार्लस साठे यांनी मानले.

यावेळी विष्णूपंत खंडागळे,अड. सर्जेराव कापसे, प्रा.विजय बोर्डे, सोमनाथ पाबळे, भास्करराव कोकणे, भाऊसाहेब मगर, आबासाहेब रणनवरे, विलास दाभाडे, पोपटराव पटारे, बापूसाहेब शिंदे, बंडू बोडखे, रावसाहेब मगर, ग्रामविकास अधिकारी आर एफ जाधव, गोपीचंद काठेड, महेंद्र संत, विलास सपकाळ, प्रकाश दाभाडे, गोटीराम दाभाडे आदी उपस्थित होते.

सरपंच गटाची कार्यक्रमाला दांडी

ग्रामपंचायतीत सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. या सत्तेतील काँग्रेस समर्थकांनी आ. कानडे यांच्याकडे 24 तास पाणीपुरवठ्याला 24 तास वीज पुरवठा व्हावा यासाठी लिंक लाईन टाकण्यासाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती. आ.कानडे यांनी 17 लाखाचा निधी दिला. मात्र सदस्य मंडळाच्या अंतर्गत लाथाळीमुळे काम रखडले होते. नागरिकांच्या महत्वाच्या पाण्याचा प्रश्न असूनही विकास कामावर एकमत होत नसल्याने काल झालेल्या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचा कार्यक्रम असतानाही सरपंच गट व महाविकास आघाडीतील त्यांच्या गटाच्या नेत्यांनी दांडी मारली तर माजी सभापती नानासाहेब पवार गट विरोधी बाकावर असतानाही विकासाला साथ देत कार्यक्रमाला उपस्थित राहील्याने याबाबत चर्चा सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com