जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी पुलाचे काम दर्जेदार करावे - आ. कानडे

आ. कानडे
आ. कानडे

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी या पुलाचे काम दर्जेदार व चांगल्या पद्धतीने केले तरच तो पूल जास्त दिवस टिकेल, असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी गुजरवाडी- खिर्डी रस्त्यावरील पुलास पडलेल्या भगदाडाच्या भूमीपूजन प्रसंगी केले.

खिर्डी-गुजरवाडी रस्त्यावरून गणेशखिंड देवस्थानला जोडणार्‍या व टाकळीभानकडे जाणार्‍या रस्त्यावर भंडारदरा धरणाच्या ब्रिटीश कालावधीत 140 वर्षांपूर्वी बांधलेल्या कालव्याच्या पुलावर मोठे भगदाड पडून पूल अत्यंत धोकादायक झाला होता. येथील ग्रामस्थ व देवस्थानला येणार्‍या भाविक भक्तगणांसाठी हा महत्त्वाचा रस्ता असल्याने प्रवाशांना पर्यायी रस्ता शोधावा लागत असल्याने डोकेदुखी झाली होती.

सदरचे काम अपघातांचा धोका टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. या बाबींचा विचार करून आ. कानडे यांनी सदरचे काम तातडीने मंजूर करून घेतले. या भगदाडावर माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी आंदोलन केले होते. पुलाचे काम तातडीने करण्याची मागणी करून जलसंपदा विभागाला चार महिन्यांपूर्वी या पुलाच्या संदर्भात निवेदन देऊन ठिय्या आंदोलन केले होते. अशोक कानडे यांनी सदर कामाचा पाठपुरावा केला होता.

यावेळी माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, अशोक कानडे, विष्णूपंत खंडागळे, कार्लस साठे, राजेंद्र कोकणे, सोमनाथ पाबळे, भाऊसाहेब पारखे, बंडू बोडखे, भरत जाधव, आबासाहेब रणनवरे, बापूसाहेब शिंदे, विनोद रणनवरे, सुंदर रणनवरे, सुरेश पवार, हरिभाऊ बनसोडे, योगेश आसने, मच्छिंद्र मासाळ, संदीप जाधव, भास्कर तुवर, रवींद्र तुवर तसेच जलसंपदा विभागाचे उपअभियंता संजय कल्हापुरे आदी उपस्थित होते.

डॉ. मुरकुटेंच्या आंदोलनाला यश

पुलाला पडलेल्या भगदाडामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने प्रवाशांना सुमारे तीन कि. मी.चा वळसा मारून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे डॉ. वंदना मुरकुटे यांनी या पुलावर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आ. कानडे यांनी या मागणीची दखल घेत या पुलाच्या दुरुस्तासाठी निधी उपलब्ध केल्याने प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने डॉ. मुरकुटे यांच्या ठिय्या आंदोलनाला यश आल्याची परीसरात चर्चा आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com