एकल महिलांना कर्ज वाटप हा जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम- आ. कानडे

नियमित कर्ज फेडल्यास दुप्पट रकमेचे कर्ज उपलब्ध करून देणार-ससाणे
एकल महिलांना कर्ज वाटप हा जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम- आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोना काळात ज्या माता-भगिनीच्या पतींचा करोनामुळे निधन झाले अशा निराधार महिलांना श्री शक्ती ग्रुप व विद्या महिला कला निकेतनच्या सहकार्याने जिल्हा बँकेने कर्ज वाटप करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन आ. लहू कानडे यांनी केले.

दिपालीताई ससाणे व विद्याताई क्षीरसागर यांनी अशा निराधार महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी जे एल जी महिला बचत गट स्थापन केले. जिल्हा सहकारी बँकेच्यावतीने महिलांच्या या बचत गटांना प्रत्येकी एक एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. आ. लहु कानडे यांच्याहस्ते व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी प्रमुख भाषणात आ कानडे म्हणाले, की दिपाली ससाणे यांनी बचत गटाच्या माध्यमातून निराधार महिलांना मोठा आधार दिला आहे. गोरगरीब जनतेला मदत करण्याचा स्व. जयंतराव ससाणे यांचा वारसा करण ससाणे यांनी पुढे चालवला असून सौ. ससाणे यांच्या कार्याचा गौरव केला.

उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले, की श्री शक्ती ग्रुप, विद्या कलनिकेतन यांनी मोठे परिश्रम घेऊन घरचा कर्ता पुरुष गमावल्यामुळे निराधार झालेल्या महिलांचा सर्व्हे केला. त्यांचा मेळावा घेऊन आज 25 महिलांना प्रत्येकी 20,000 रुपये कर्ज देण्यात मोठा पुढाकार घेतला.

सचिन गुजर म्हणाले, की निराधार झालेल्या माता भगिनींच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असून त्यांना कोणतीही अडचण असेल त्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

संजय छल्लारे यांनी दीपालीताई ससाणे व विद्याताई क्षीरसागर यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सर्वसामान्य महिलांसाठी करत असलेल्या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे, नगरसेवक मुजफ्फरभाई शेख, रितेश रोटे, अण्णासाहेब डावखर, श्याम अडांगळे, प्रवीण नवले, रियाज पठाण, जावेद शेख, मनोज बागुल, निलेश भालेराव, संतोष परदेशी, बाबा वायदंडे, सरबजीत सिंग चूग, राहुल बागुल, मंगलसिंग साळुंखे, सनी मंडलिक, राहुल शिंपी, रावसाहेब आल्हाट, सुरेश ठुबे, अमोल चिंतामणी, रितेश एडके, संजय गोसावी, प्रताप गुजर, गोपाल भोसले उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्याताई क्षीरसागर यांनी केले तर सूत्रसंचालन अजय धाकतोडे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com