वंदनाताईंनी सभापतीपदाच्या संधीचे सोनं करावे-आ.कानडे

विरोधकांना बरोबर घेवून काम करु-सभापती डॉ. वंदना मुरकुटे
वंदनाताईंनी सभापतीपदाच्या संधीचे सोनं करावे-आ.कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुका अत्यंत समजुतदार आहे. वंदनाताईंना सभापतीपदाची जी संधी मिळाली आहे त्या संधीचे त्यांनी सोनं करावे. मुळात ही लढाई निती विरुध्द अनितीची आहे. राजकारणात अभ्यासू, बुध्दीमान याला एक चिंतनाची परंपरा आहे. अशा लोकांची कमतरता असल्याचे प्रतिपादन आ. लहू कानडे यांनी केेले.

पंचायत समितीच्या सभापतीपदी डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्या निवडीनंतर त्यांनी पदभार स्विकारला. त्यानंतर झालेल्या सत्कार सोहळ्यात आ. कानडे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व सदस्य अरुण पा. नाईक, विजय शिंदे, ज्ञानेश्वर मुरकुटे, विष्णूपंत खंडागळे, अ‍ॅड. समिन बागवान, सतिश बोर्डे, अशोक कानडे, सरपंच भारत तुपे आदी उपस्थित होते.

आ. कानडे म्हणाले, राज्याचे नेते ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे यांनी आमच्या उमेदीच्या काळात आम्हाला बळ दिले. त्यामुळे आम्ही ही लढाई जिंकू शकलो. विरोधकांनी या काळात अनेक अडचणी निर्माण करुनही वंदनाताईंनी सर्व विरोधकांना बरोबर घेवून काम करणार असल्याचे सांगून त्यांनी त्यांची चांगली विचारसरणी दाखवून दिली. त्यांच्या अल्पशा काळात त्यांनी जास्तीत जास्त विकास कामे करावे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

यावेळी नवनिर्वाचित सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे म्हणाल्या, माझ्या या न्यायालयीन लढाईच्या काळात अनेक जणांनी मदत केली. त्यामुळेच मला ही संधी मिळाली. माझ्या या कार्यकाळात पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने तसेच विरोधकांंना बरोबर घेवून सभापतीपदाचा कारभार करु, असे आश्वासन दिले. माझ्या या यशाचे किंगमेकर हे आ. कानडे आहेत. तसेच पंचायत समितीच्या निवडणूक काळात मला अविनाश आदिक यांनी प्रामाणिकणे मदत केली. मी मुरकुटे यांची खरी वारसदार असे सचिन गुजर यांनीही सांगितले होते ते आज चित्र दिसत आहे. यावेळी अरुण पा. नाईक, इंद्रनाथ थोरात यांचीही भाषणे झाली. शेवटी विष्णूपंत खंडागळे यांनी आभार मानले.

स्व. जयंतराव ससाणे यांच्यामुळेच मला संधी मिळाली- डॉ. मुरकुटे

स्व. जयंतराव ससाणे यांनी पंचायत समिती निवडणुकीत मला उमेदवारी दिल्यामुळेच मला सभापती होण्याची संधी मिळाली. आज मला त्यांची आठवण येत आहे. ते आज असते तर मला या सभापतीपदावर बसविण्यासाठी स्वतः आले असते. आज जे काही आहे ते स्व. ससाणे यांच्यामुळेच आहे. असे नवनिर्वाचित सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी सांगत असताना त्यांना त्यांच्या आठवणीत अश्रु अनावर झाले. स्व. जी. के. बकाल यांची आठवण आज येत आहे. त्यांचेही अनमोल सहकार्य मिळाले. या दोघा नेत्यांना मी कधीच विसरु शकणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

आ. लहू कानडे म्हणाले होते की, श्रीरामपूर तालुका हा खूपच समजुतदार तालुका आहे. सगळ्यांना सांभाळून घेतल्यामुळे संधी मिळत्त असते. त्यावर इंद्रनाथ थोरात यांनी, बाहेरुन येणार्‍यांनाही हा तालुका सांभाळून घेत असल्याचा टोला मारला आणि त्यावेळी एकच हशा झाला. त्याचवेळी पे्रक्षकांमधून खासदारही बाहेरुनच आले आहेत, असा प्रतिसाद आला त्यावर ‘तालुक्याचे भाग्य’ असे थोरात म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com