श्रीरामपूरचे ग्रामीण रुग्णालय होणार करोनाचे अद्ययावत उपचार केंद्र - आ. कानडे
सार्वमत

श्रीरामपूरचे ग्रामीण रुग्णालय होणार करोनाचे अद्ययावत उपचार केंद्र - आ. कानडे

Arvind Arkhade

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पन्नास बेड्सचे करोना उपचार केंद्र तयार होणार असल्याची माहिती आ. लहू कानडे यांनी दिली.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी करोना आढावा बैठकीमध्येच आ. कानडे यांच्या तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात अद्ययावत उपचार केंद्र सुरू करण्याबाबत चर्चा झाली.

आ. लहू कानडे यांनी त्यांच्या निधीमधून तीस लाखांपेक्षा अधिक रक्कम देऊन दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी यांची प्रशासकीय मान्यता प्राप्त केली. सदरचे आदेश आजच प्राप्त झाले. कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून जिल्हा शल्यचिकीत्सक काम करणार आहेत.

यामुळे सिव्हील हॉस्पिटल वरील ताण कमी होईल शिवाय रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता विकेंद्रीत स्वरूपात तालुकास्तरावरही अधीक बेड्स उपलब्ध होणार आहेत. श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पन्नास बेड्सचे करोना उपचार केंद्र तयार होईल. यापैकी पाच बेड्सचे आयसीयू सेंटर असेल व त्यांना व्हेंटिलेटर्सची सुविधा असेल.

या सर्व पन्नास बेड़्सना ऑक्सीजन पुरवठ्याची सोय असणार आहे. औषध पुरवठा मागणीनुसार सिव्हील हॉस्पिटल व जिल्हाधिकारी करणार आहे.आ. लहू कानडे यांनी वैद्यकीय उपकरणे, ऑक्सीजन सुविधा, बेड्स यांच्या खरेदीसाठी तसेच पीपीईकीट्स, हॅन्डग्लोव्हज, टायजर, वगैरे साहित्य खरेदीसाठीही निधी उपलब्ध करून दिला आहे.

हे सर्व काम पूर्ण होऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली किमान एका आठवड्यात श्रीरामपूर येथेच उपचार सुरू होण्यासाठी आ. कानडे पाठपुरावा करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com