कोळपेवाडी |वार्ताहर| Kolpewadi

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील मागील पाच वर्षापासून रस्ते विकासाचा अनुशेष खूप मोठा असून या रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी निधी मिळावा यासाठी

आ. आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु असून त्या पाठपुराव्यातून (प्रजिमा 5) च्या टाकळी ते रवंदे या अडीच किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी व मजबुतीकरणासाठी नाबार्डकडून 2 कोटी 50 लाख 53 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली.

कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या (प्रजिमा 5) च्या टाकळी ते रवंदे या अडीच किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. त्यामुळे या रस्त्यावरून नियमितपणे ये-जा करणार्या रवंदे, टाकळीच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या अडीच किलोमीटर खराब रस्त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत असल्यामुळे रवंदे, टाकळीच्या नागरिकांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आ. आशुतोष काळे यांना साकडे घातले होते.

खराब रस्त्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेवून आ. काळे यांनी शासनदरबारी पाठपुरावा सुरु होता. मतदार संघातील खराब रस्त्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी मागील वर्षापासून आलेल्या कोरोना संकटात देखील अनेक रस्त्यांसाठी निधी मिळविण्यासाठी आ. काळे प्रयत्नशील आहे. त्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत आहे.

मागील पाच वर्षापासून या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून या रस्त्यासाठी निधी मिळविल्याबद्दल रवंदे, टाकळी च्या नागरिकांनी व या रस्त्याने नियमितपणे ये-जा करणार्या वाहनधारकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.