कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

मागील काही वर्षात रस्ते दुरुस्तीचा मोठा अनुशेष निर्माण झाल्यामुळे मतदार संघाचा विकास खुंटला होता.

मतदार संघातील अनेक रस्ते नकाशावर घेऊन त्या रस्त्यांना महाविकास आघाडी सरकार कडून निधी मिळविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून मतदार संघात रस्त्यांचे जाळे निर्माण करून विकास साधणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

तालुक्यातील मढी खुर्द येथे ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मोहनराव आभाळे होते.ते म्हणाले, मतदार संघातील रस्त्यांच्या प्रश्नाबरोबरच वीज आणि पाणी हे प्रश्न देखील महत्त्वाचे असून त्याबाबत करीत असलेल्या पाठपुराव्यामुळे या कामांसाठी करोनाच्या संकटात देखील निधी उपलब्ध होऊन हे प्रश्न मार्गी लागत आहेत.

गावातील वाड्या वस्त्या व भाऊबंदकी व अंतस्थ वाद बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी युवकांनी व सुशिक्षित नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले. यावेळी सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, सुधाकर रोहोम, अनुसयाताई होन, पंचायत समिती अभियंता उत्तम पवार, रोहिदास होन, मोहनराव आभाळे, रंभाजी आभाळे, सोपानराव आभाळे, वैशालीताई आभाळे, मनीषाताई आभाळे, सुनील मोकळ, भाऊसाहेब आभाळे, वसंतराव आभाळे, उत्तमराव कुर्हाडे, प्रमोद आभाळे, कचेश्वर डूबे, केशव विघे, नामदेव गवळी, प्रविण निंबाळकर, आप्पासाहेब गवळी, प्रकाश आभाळे, रवींद्र गवळी, बिपीन गवळी, राजेंद्र गायकवाड, हिराबाई गवळी, श्रीधर आभाळे, माधवराव आभाळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.