835 किमीचे 436 रस्ते नकाशावर आणण्यासाठी प्रयत्नशील - आ. काळे

835 किमीचे 436 रस्ते नकाशावर आणण्यासाठी प्रयत्नशील - आ. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी|Kopargav

मतदार संघातील रस्त्यांचा अनुशेष खूप मोठा आहे. अनेक रस्ते नकाशावरच नाहीत. हे रस्ते नकाशावर आणण्यासाठी 2021 पासून सुरू होणार्‍या

योजनेसाठी 835 किलोमीटरचे 436 रस्ते जिल्हा परिषदेकडेकडून सरकारकडे मंजुरीसाठी पाठविले जाणार आहे. या रस्त्यांना मंजुरी मिळविण्यासाठी सरकारकडे सर्वोतोपरी प्रयत्न करून या रस्त्यांसाठी निधी आणू असे अश्वासन आ. आशुतोष काळे यांनी दिले.

रवंदे, सांगवीभुसार व धामोरी येथे विकास कामांचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, रस्ते नकाशावर आणू नका असा अनेकांनी सल्ला दिला. रस्ते नकाशावर आले तर निधी मिळविण्यात अडचणी येतील, रस्ते नकाशावर आणणे म्हणजे स्वत:साठी स्वत::खड्डा खोदण्यासारखे असल्याचे अनेकांनी सांगितले. मात्र रस्ते नकाशावर येऊन जर जनतेचे महत्त्वाचे प्रश्न सुटणार असेल तर जनतेच्या हितासाठी अशा खड्ड्यात जाण्यास कधीही माघार घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

रस्त्यांबरोबरच मागील पाच वर्षांत विजेचा देखील गंभीर प्रश्न निर्माण करून ठेवला गेला आहे. मतदार संघातील एकूण 550 वीज रोहित्रांवर त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त भार असल्यामुळे हे रोहित्र नादुरुस्त होत असून पाणी आहे पण वीज नाही वीज असली तरी पूर्णक्षमतेने मिळत नाही. अशी परिस्थिती संपूर्ण मतदार संघात आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ओव्हरलोड रोहित्र बदलणेसाठी व कमी दाबाच्या वीज वाहिन्या, पोल स्थलांतरीत करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन समितीमधून दीड कोटी रुपये निधी मिळविण्यात यश मिळाले आहे.

यावेळी सभापती पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक ज्ञानदेव मांजरे, अशोक काळे, माजी संचालक बाळासाहेब कदम, नारायण मांजरे, चंद्रशेखर कुलकर्णी, राजेंद्रबापु जाधव, पंचायत समिती सदस्य अनिल कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, माजी संचालक भगवान माळी, पुंडलिक माळी, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, उपअभियंता उत्तम पवार, आर.टी. दिघे, विजयराव जाधव, सुखदेव घायतडकर, सर्जेराव घायतडकर, उत्तम भुसे, प्रकाश दवंगे, अमोल कदम, दत्तात्रय कदम, गणेश घायतडकर, केशव कंक्राळे, शिवाजीराव गायकवाड, रमेश आहेर, नानासाहेब शिंदे, बाळासाहेब कासार, राहुल जगधने, अशोक जाधव, सोपान कासार, साहेबराव जाधव, दिलीप गायकवाड, माणिक शिंदे, डॉ. कृष्णराव जगझाप, विलास माळी, सुभाष आहिरे, भास्कर वाघ, मनोज माळी, पोपट माळी, देवराम माळी, शिवाजी पेखळे आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com