डॉ. आंबेडकरांच्या विचारातून समाजाला प्रगतीसाठी दिशा मिळत आहे - आ. काळे

डॉ. आंबेडकरांच्या विचारातून समाजाला प्रगतीसाठी दिशा मिळत आहे - आ. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रचंड बुद्धिमत्तेचा महासागर होते. समाजासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.

शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करून त्यांनी समाजासाठी आपलं आयुष्य वेचलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण व त्यांच्या विचारांचे सर्वांनी अनुकरण गरजेचे असून आजही त्यांच्या विचारातून समाजाला प्रगतीसाठी दिशा मिळत आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच कोपरगाव शहरातील टिळकनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पद्माकांत कुदळे, संदीप वर्पे, सुनील गंगुले, विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, सुनील शिलेदार, संतोष चवंडके, डॉ. अजय गर्जे, धरमशेठ बागरेचा, नवाज कुरेशी, दिनार कुदळे, कृष्णा आढाव, दिनकर खरे, फकीरमामु कुरेशी, सौ. मायादेवी खरे, राहुल देवळलीकर, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र खैरनार, डॉ. तुषार गलांडे, जावेद शेख, सुनील मोकळ, दादासाहेब साबळे, रावसाहेब साठे, चंद्रशेखर म्हस्के, इम्तियाज अत्तार, संदीप कपिले, वाल्मिक लहिरे, बापू वढणे, राजेंद्र आभाळे, मुकुंद इंगळे, मनोज कडू, संतोष टोरपे, धनंजय कहार, शुभम लासुरे, जय बोरा, सलीम पठाण, आकाश डागा, गणेश लकारे, प्रकाश दुशिंग, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विजय त्रिभुवन, नितीन शिंदे, मनोज शिंदे, शंकर घोडेराव, प्रताप गोसावी, मुन्ना पठाण, संतोष बारसे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com