आमदार काळेंनी पालकमंत्र्यांना घातले 'हे' साकडे

आमदार काळेंचे पालकमंत्र्यांना साकडे
आमदार काळेंनी पालकमंत्र्यांना घातले 'हे' साकडे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आढळून येत असलेल्या करोना बाधित रुग्णाच्या संख्येमुळे आरोग्य विभागाला जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे आदेश देण्यात आले असून त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी टेस्टिंग किटची कमतरता पडू देवू नका असे साकडे आमदार आशुतोष काळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना घातले आहे.

वाढत्या करोना बाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी शुक्रवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची मुंबई येथे भेट घेतली. करोना बाधित रुग्णांची रोजची आकडेवारी पाहता करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. कोपरगाव तालुक्यात देखील मागील एक महिन्यापासून कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून दररोज करण्यात येत असलेल्या तपासणीतून शेकडो रुग्णांची भर बाधित रुग्णाच्या संख्येत पडत आहेत.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची तपासणी करावी लागणार असून तालुक्यातील प्रत्येक गावात जावून बाधित रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेवून तपासणी करावी लागणार आहे. आढळून येत असलेल्या बाधित रुग्णाच्या संख्येचा विचार करता यापुढे मोठ्या प्रमाणात टेस्टिंगकिटची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे बाधित रुग्णाच्या संपर्कातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून प्रत्येक व्यक्तीची तपासणी करावी लागणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात टेस्टिंग किटची आवश्यकता भासणार असून आवश्यक असणारा टेस्टिंग किटचा पुरवठा कोपरगाव तालुक्यासाठी करण्यात यावा असे साकडे आ. काळे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना घातले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com