जलजीवन मिशन योजनेची 10 टक्के लोकवर्गणीची अट रद्द करा

आमदार आशुतोष काळे यांचे अजित पवारांना साकडे
जलजीवन मिशन योजनेची 10 टक्के लोकवर्गणीची अट रद्द करा

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

राज्यात राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजनांसाठी ग्रामपंचायतीने

दहा टक्के निधी लोकवर्गणीतून जमा करण्याची अट रद्द करावी, असे साकडे आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घातले आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध गावांच्या पाणी योजना मार्गी लागाव्यात यासाठी आमदार आशुतोष काळे प्रयत्न करीत आहेत. शासनाच्यावतीने या योजनांना जलजीवन मिशन योजना सुरू करण्यात आली आहे.

ज्या गावाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या गावातील 80 टक्के कुटुंबांकडून या योजनेच्या एकूण पायाभूत सुविधा खर्चातील एकूण भागभांडवलापैकी 10 टक्के लोकवर्गणी गोळा होणे आवश्यक आहे. मात्र कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतींकडून लोकवर्गणी गोळा होणे शक्य नाही.

त्याबाबत आ.काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कष्टकरी नागरिक व आर्थिक परिस्थिती कमकुवत असणार्‍या कुटुंबाचा प्रामुख्याने समावेश असल्यामुळे सदरच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजनांसाठी ग्रामपंचायतीकडून 10 टक्के लोकवर्गणी गोळा करणे अशक्य आहे. त्यामुळे लोकवर्गणी जमा करण्याची अट रद्द करावी अशी मागणी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com