आमदार जगतापांनी पालकमंत्र्यांसमोरच एसपी, आयुक्तांचे काढले वाभाडे

बैठकीत तोडगा काढण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरातील मोकाट जनावरे, केडगावात भरदिवसा चोरट्यांची दहशत, वाहतूक समस्या आणि रस्त्याच्या कामावरून आमदार संग्राम जगताप यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोरच एसपी आणि आयुक्तांचे वाभाडे काढले. अनेकदा सांगूनही प्रशासनातील अधिकारी ऐकत नसल्याची व्यथा आ. जगताप यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडली.

जिल्ह नियोजन भवनमध्ये झालेल्या बैठकीप्रसंगी आमदार जगताप यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. केडगाव उपनगरात गेल्या पंधरा दिवसांपासून चोरट्यांची दहशत आहे. चारशे-पाचशे लोक एकत्रितपणे रात्रीची गस्त घालतात. पोलीस दखल घेत नाही, अनेकांच्या तक्रार घेत नाही. लोकांनी स्वसंरक्षणाची वेळ येणे हे दुर्देव आहे. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास चोर आल्याची हाळी दिली जाते. दिवसाढवळ्या चोर्‍या होत असतील तर पोलीस करतात काय? असा सवाल करत आमदार जगताप यांनी शहरातील वाहतूक समस्येवरूनही एसपींची तक्रार पालकमंत्र्यांकडे केली.

शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न आहे. अनेक रस्त्यावर जनावरे ठाण मांडून बसलेली असतात. आयुक्तांना सांगून त्यांनी एकाही जनावराचा बंदोबस्त केलेला नाही. कलेक्टर ऑफिससमोरचा रस्ता करण्यासाठी आंदोलन केले. त्यानंतर रस्त्याचे काम मंजूर झाले, निधीही आला. पण चार महिन्यानंतरही रस्त्याचे काम सुरू झाले नाही. आयुक्तांनीच पालकमंत्र्यांसमोर हे खरं की खोटं हे सांगावं, या शब्दांत आमदार जगताप यांनी महापालिका आयुक्तांनाही झापले.

..............

जिल्हास्तरावरच सुटावेत प्रश्न

नगर शहरातील छोटे प्रश्न विधानसभेत मांडणे योग्य नाही. शहरातील छोटे प्रश्न हे जिल्हास्तरावर सुटावते ही अपेक्षा आहे. नगर शहर हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे असे सांगत आमदार जगताप यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासमोरच जिल्हा प्रशासनातील दोन मह्त्वाच्या अधिकार्‍यांच्या कामगिरीची चिरफाड केली. पालमंत्री मुश्रीफ यांनी यासंदर्भात जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com