आ. पडळकर यांच्यावर कर्जतमध्ये गुन्हा दाखल

तेढ निर्माण करणारे वक्तव्य भोवले
आ. पडळकर यांच्यावर कर्जतमध्ये गुन्हा दाखल

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांच्याविरोधात दोन समाजात तेढ निर्माण (Creating a Rift in Society) होईल, असे वक्तव्य केल्यावरून कर्जत पोलीस ठाण्यामध्ये (Karjat Police Station) गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे.

कर्जत तालुक्यातील (Karjat Taluka) धनगर समाजातील (Dhangar Samaj) विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी बुधवारी कर्जत पोलीस ठाण्यामध्ये (Karjat Police Station) लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर रवींद्र पांडुळे, अंगद रूपनर, महेश काळे, विजय पावणे, तानाजी पिसे, सागर मदने, चंद्रकांत खरात व लहू रूपनर यांच्या सह्या आहेत.

आ. पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी कर्जत तालुक्यातील बेनवडी फाटा व चापडगाव येथे मंगळवार, 31 मे रोजी नागरिकांशी व प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार (MP Sharad Pawar), आ. रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्यासह चौंडी (Chaundi) येथे आलेल्या अनेक मंत्री व इतर व्यक्ती यांच्या बद्दल अपशब्द वापरले. यामुळे त्यांच्या विरोधात दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले म्हणून भादवि कलम 505 (2) अन्वये गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com