बौद्ध सेवा संघाचे कार्य दिशादर्शक- आ. डॉ. तांबे

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समाजरत्न पुरस्काराने गौरव
बौद्ध सेवा संघाचे कार्य दिशादर्शक- आ. डॉ. तांबे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे अशा महामानवांनी समाजात समतेचा विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यानुसारच बौद्ध सेवा संघाचे कार्यदेखील समाजासाठी दिशादर्शक आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीत अशा कार्याची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

येथील बौद्ध सेवा संघाच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समाजरत्न पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. लहू कानडे होते. जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, मुख्याध्यापक संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भागचंद औताडे, जिल्हा बँकेचे माजी व्यवस्थापक नानासाहेब रेवाळे, अ‍ॅड. रावसाहेब मोहन यावेळी उपस्थित होते.

आ. डॉ. तांबे पुढे म्हणाले कि, आज समाजात दुही निर्माण करण्याचे प्रयत्न काही घटक करीत आहेत. परंतु पुरोगामी चळवळीतील चांगल्या विचारांची माणसं आजही कार्यरत आहेत. आ. कानडे यांनी, बौद्ध सेवा संघाच्या कार्याला आपले नेहमी सहकार्य राहील, असे सांगितले. यावेळी करण ससाणे, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण, रयत बँकेचे माजी चेअरमन गोरक्षनाथ बनकर यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी बौद्ध सेवा संघातर्फे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्‍या आप्पा मोहन, विश्वनाथ बोकफोडे, सलीमखान पठाण, गोरक्षनाथ बनकर, सुगंधराव इंगळे, सुरेश चौदंते, अंकुश कानडे, कार्लस साठे, डॉ. वसंत जमधडे, बाळासाहेब वैद्य, डॉ. राजेंद्र लोंढे, प्रा. शिवाजी पंडित, शेख अहमद जहागिरदार, महेंद्र त्रिभुवन, सुभाष तोरणे, छगन बनकर, श्रावण भोसले, प्रकाश माने, अशोक दिवे, सरिता सावंत, वैशाली अहिरे, सुरेश देवकर, विजय शेलार, दीपक कदम, दिलीप सोनवणे, श्रीकांत मोरे, विनोद वाघमारे आदींना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बौद्ध सेवा संघाचे दिवंगत सरचिटणीस दादासाहेब साठे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, अशोक बागुल, संतोष मोकळ, उद्योगपती जितेंद्र तोरणे, मिलिंदकुमार साळवे, सुभाष गोरे, के. टी. निंभोरे, ल. बा. कोल्हे, शब्बीर शेख, सुभाष गायकवाड, गौरव देवरे, मनिष पंकमुज, पास्टर अमोलिक, अविनाश काळे, बबन जोर्वेकर, सूर्यकांत अग्रवाल, मंगल तोरणे, प्रतिभा देवरे, विमल मोहन, विजय बोरडे उपस्थित होते.प्रास्ताविक प्रताप देवरे, सूत्रसंचालन प्रा. शशिकांत बनकर तर आभार चंद्रकांत मगरे यांनी मानले.

कार्यक्रमासाठी बौद्ध सेवा संघाचे संस्थापक प्रताप देवरे, प्रकाश खैरे, चंद्रकांत मगरे, मच्छिंद्र धनसिंग, श्रीराम मोरे, भाऊसाहेब सोनवणे, छायाताई सोनवणे, देविदास पंडित, लक्ष्मण मोहन, सुगंधराव इंगळे, प्रकाश सावंत, दिलीप प्रधान, अशोक दिवे, वसंत साळवे, सुभाष तोरणे यांनी प्रयत्न केले.

Related Stories

No stories found.