समर्पण आणि सेवावृत्तीने केलेले करोना योध्द्यांचे कार्य कौतुकास्पद - आ. डॉ. तांबे

बाबा प्रतिष्ठानच्यावतीने करोना काळात योगदान देणार्‍या मान्यवरांचा सन्मान सोहळा
समर्पण आणि सेवावृत्तीने केलेले करोना योध्द्यांचे कार्य कौतुकास्पद - आ. डॉ. तांबे

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

समर्पण आणि सेवा हा प्रत्येक भारतीयाचा स्थायी भाव आहे. या भावनेतून करोना योध्द्ांनी बजावलेली आपली कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यामुळेच भारतासारखा विशाल देश करोना विषाणू संसर्गाला नियंत्रणात आणू शकला. बाबा प्रतिष्ठानने केलेला सन्मान हा गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून दत्तनगर परिसरातील बाबा प्रतिष्ठाणने करोना काळातील डॉक्टर, अंगणवाडी सेविका, परिचारिका, रिक्षा चालक, अंबुलन्स चालक, सफाईकामगार, डबेवाले, आदींचा गौरव करून त्यांचा सन्मान केला व तसेच माता रमाई,समाजभूषण व जेष्ठ साहित्यिक पुरस्कार दिल्याची बाब कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. आ. तांबे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार टाकून अभिवादन करण्यात आले व आ. तांबे यांच्या हस्ते करोना योध्द्ांना सन्मान पत्र व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे होते. सुरुवातीला प्रास्तविक जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य बाबासाहेब दिघे यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, माजी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, लोकनियुक्त सरपंच सुनिल शिरसाठ, उपसरपंच प्रेमचंद कुंकूलोळ, लायन्स क्लबचे अध्यक्ष सुनिल साठे, प्रविण गुलाटी, उद्योगपती अजित आरबट्टी, लहानू त्रिभूवन, डॉ.दिलीप शिरसाठ, डॉ.मच्छिंद्र त्रिभुवन, डॉ.संजीवनी कांबळे, भगवानसेठ कुंकूलोळ, रमेश लोढा, सुनिल जगताप, हिरालाल जाधव, शहाजान बागवान, किरण खंडागळे, जीवन पांडे, संजय गोसावी, विक्की जैन, कुमार दिवे, सागर भोसले, यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी करण ससाणे, सचिन गुजर आदींचे भाषणे झाली बाबा प्रतिष्ठानच्या वतीने दत्तनगर येथील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमानंतर मुंबई येथील टिव्हीस्टार निशाजी भगत यांचा भिमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला यासाठी सरपंच सुनिल शिरसाठ व रामचंद्र जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष संजय शिरसाठ, सुनिल जगताप, सुनिल उबाळे, दिनेश तरटे, सिद्धार्थ गायकवाड, कुणाल चावरे, अजय शिंदे, इंद्रजित गायकवाड, सतीश ठोंबरे, सुनिल पवार, संदिप अंभोरे, आनंद चावरे, सुरेश शिवलकर, मंगेश जगताप,सुभाष पठारे, संजय कोळगे, सुनिल शिंदे,जय आठवल, राहुल आठवल, बिबिषण गायकवाड, आदित्य शिरसाठ, संघकारा डोळसे, प्रतिक गायकवाड, यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार उद्योगपती भगवानशेठ कुंकूलोळ यांनी मानले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश तरटे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दत्तनगर जि.प. शाळेच्या मुलांनी भिमगीतांवर लक्षवेधी नृत्य करताच लायन्स क्लब श्रीरामपूर व बाबा प्रतिष्ठानने या सर्व मुलांना स्कूल बग व पौष्टीक आहार देताच शालेय मुलांच्या चेहर्‍यावर आनंदाचे वातावरण दिसून आले.

Related Stories

No stories found.