ना. थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचे सहकार मॉडेल देशाला दिशादर्शक - आ. डॉ. तांबे

ना. थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचे सहकार मॉडेल देशाला दिशादर्शक - आ. डॉ. तांबे

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात (Sahakar Maharshi Bhausaheb Thorat) यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्त्वांवर कारखान्याची (Factory) वाटचाल सुरू आहे. अनेक ठिकाणी सहकार मोडकळीस आलेला असताना संगमनेरचा (Sangamner) सहकार हा राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली संपूर्ण देशाला दिशादर्शक मॉडेल ठरत असल्याचे गौरवोद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे (MLA Dr. Sudhir Tambe) यांनी काढले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा (Sahakar Maharshi Bhausaheb Thorat of Sahakari Sugar Factory) सन 2021- 22 या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ हे होते. तर व्यासपीठावर बाजीराव पा. खेमनर, दुर्गाताई तांबे, लक्ष्मणराव कुटे, अमित पंडित, उपाध्यक्ष संतोष हासे, सभापती सुनंदाताई जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, रामहरी कातोरे, साहेबराव गडाख, सुभाष सांगळे, गणपतराव सांगळे, सुरेश झावरे, मीराताई शेटे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी चंद्रकांत कडलग व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वैशालीताई कडलग, भाऊसाहेब शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. पुष्पाताई शिंदे, मीनानाथ वर्पे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. हिराताई वर्पे, माणिकराव यादव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. लताताई यादव, संभाजीराव वाकचौरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सिंधुताई वाकचौरे यांच्याहस्ते बॉयलरची विधिवत पूजा झाली.

यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे (MLA Dr. Sudhir Tambe) म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (Sahakar Maharshi Bhausaheb Thorat) यांच्या आदर्श तत्त्वावरील या सहकाराची वाटचाल सुरू आहे. कारखान्याचे व्यवस्थापन अतिशय उत्तम आहे. नामदार बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने घेतलेल्या नवीन कारखान्याचा निर्णय अत्यंत धोरणात्मक व दूरदृष्टीचा ठरला आहे. यातून पुढील पन्नास वर्षांचे नियोजन झाले असून या कारखान्याने आपल्या गुणवत्तेतून सभासदांचा व ऊस उत्पादकांचा मोठा विश्वास राखला आहे. साखर कारखानदारी अडचणीत असताना सुद्धा थोरात कारखान्याने आपल्या लौकिकका प्रमाणे शेतकर्‍यांना सर्वोत्तम भाव दिला आहे. वीज निर्मितीचा घेतलेला निर्णय हा अत्यंत फायदेशीर ठरला आहे. संगमनेरचा सहकार व तालुक्याच्या विविध घटनांचा ना. थोरात (Revenue MinisterBalasaheb Thorat) दैनंदिन आढावा घेत असून तालुक्यातील जन माणसाच्या विकासासाठी अविरत पणे झटणारे त्यांचे नेतृत्व राज्यासाठी अभिमानास्पद काम करत आहे.

निळवंडे धरण (Nilwand Dam) नामदार थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी पूर्ण केले असून कालव्यांच्या कामाला अत्यंत गती दिली आहे. दुष्काळी भागाला पाणी हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास असल्याचे आमदार डॉ. तांबे (MLA Dr. Sudhir Tambe) यांनी म्हटले आहे.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या, संगमनेरचा सहकार हा देशाला दिशादर्शक आहे. नामदार बाळासाहेब थोरात हे राज्यभर काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत असून त्यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने ई पीक पाहणी, डिजिटल सातबारा घरपोहच असे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. राज्यात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असताना सुद्धा प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होत असून सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी काम करत असल्याचेही त्या म्हणाल्या.

याप्रसंगी कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, संपतराव गोडगे, भास्करराव आरोटे, डॉ. तुषार दिघे, दादासाहेब कुटे, विनोद हासे, अनिल काळे, सौ. मंदाताई वाघ, श्रीमती मीराताई वर्पे, रामदास वाघ, प्रा. बाबा खरात, सुभाष पा. गुंजाळ, शिवाजी जगताप, रामनाथ कुर्‍हे, कामगार संचालक केशव दिघे, राजेंद्र कढणे, शंकर ढमक, भास्कर पानसरे, नवनाथ गडाख, रामदास तांबडे, किरण कानवडे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.

कार्यकर्त्यानी आत्मविश्वासाने फ्लेक्स लावले : इतरांनी काळजी करू नये - ओहोळ

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर ना. थोरात यांनी त्वरित कालव्यांच्या कामाला गती दिली. आता काही पुढारी टीका करतात त्यांना कालव्यांच्या कामाची गती पहावत नाही. त्यांच्या बातम्या पहा कधी ते म्हणतात सत्तेसाठी काँग्रेसला लाचार आहे. आता लाचार कोण आहे ही जनता ठरवते आहे. नामदार थोरात यांच्या कामावर जनतेचा मोठा विश्वास असल्याने कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने निळवंडे बाबतचे फ्लेक्स लावले आहेत. त्यामुळे इतरांनी काळजी करू नये. आपण काय योगदान दिले याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे,असा टोला त्यांनी लगावला.

Related Stories

No stories found.