आमदारांचा विकास निधी 5 कोटी, नगर जिल्ह्याला 13 कोटी मिळाले

आमदारांचा विकास निधी 5 कोटी, नगर जिल्ह्याला  13 कोटी मिळाले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मतदारसंघातील विकास कामांसाठी दिला जाणारा स्थानिक विकास निधी चार कोटीवरून पाच कोटी रुपये करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. आता त्यांची अंमलबजावणी झाली असून नगर जिल्ह्यासह 23 जिल्ह्यांना 241 कोटी 83 लाख 33 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक अर्थ विभागाकडून काल जारी करण्यात आले आहे.

यात नगर जिल्ह्यात 12 विधानसभा सदस्य, तर विधापरिषदेचे एक असे एकूण 13 सदस्य आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांच्या आमदारांसाठीच्या विकासनिधीत प्रत्येकी 1 कोटींची वाढ करण्याच्या घोषणेमुळे नगर जिल्ह्याला आता 13 कोटींचा अतिरिक्त विकास निधी मिळाला आहे.

ज्या जिल्ह्यांचा खर्च 60 टक्के किंवा त्यापेक्षा जादा झाला आहे. त्या जिल्ह्यांनाच पूरक मागणीद्वारे मंजूर निधी वितरीत करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. त्यानुसार यापूर्वी 23 जिल्ह्यांना 241 कोटी 83 लाख 33 हजार निधी गवितरीत करण्ता आला आहे. आता नगर, सोलापूर, जालना व यवतमाळ या जिल्ह्यांचा खर्च 60 टक्के गझाल्याने या जिल्ह्यांना 41 कोटींचा निधी वितरीत करण्यात येत आहे. त्यात नगर जिल्ह्यातील आमदारांचा 13 कोटी रूपयांच्या निधीचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com