प्रत्येक आमदाराला मिळणार 80 लाखांचा निधी

प्रत्येक आमदाराला मिळणार 80 लाखांचा निधी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आमदार विकास निधीसाठी 276 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांसाठी प्रत्येक आमदाराला 80 लाख रूपयांचा निधी मिळाला आहे. हा निधी जिल्ह्यातील विकास कामांसाठी वापरला जाणार आहे. सर्वपक्षीय आमदारांना प्रत्येकी 80 लाखांचा विकास निधी मिळणार आहे. नगर जिल्ह्यातील 12 विधानसभा सदस्य आणि 2 विधान परिषद सदस्य अशा 14 आमदारांना एकूण 1 कोटी 60 लाखांचा निधी प्राप्त होणार आहे.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 1468 कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या तरतूदीमधील दहा टक्के निधी हा आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली याहे.

त्यानुसार एप्रिल ते जून 2022 या महिन्यांसाठी आमदारांचा 2022 -23 या आर्थिक वर्षातील कार्यकाळ विचारात घेऊन यापूर्वीच नीधी वितरीत करण्यात आला होता. आता नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांसाठी 276 कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक आमदाराला 80 लाख रूपयांचा निधी मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com