अमृतवाहिनी बँकेसह संगमनेरच्या सर्व संस्थांचे काम दिशादर्शक - आ. थोरात

अमृतवाहिनी बँकेसह संगमनेरच्या सर्व संस्थांचे काम दिशादर्शक - आ. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

सहकारी बँका व पतसंस्था यांना रिझर्व बँकेचे अनेक बंधने आहेत. या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून सातत्याने नागरिक ठेवीदार व सभासदांचा विश्वास आणि गुणवत्ता अमृतवाहिनी बँकेने जपली आहे. डिजिटल उपक्रम राबवताना अमृतवाहिनी बँकेसह संगमनेरच्या सर्व संस्था गुणवत्तापूर्ण कामामुळे राज्यातील सहकारासाठी दिशादर्शक ठरत असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

वसंत लॉन्स येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेच्या 41 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन सुधाकर जोशी होते. तर व्यासपीठावर बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, बाबासाहेब ओहोळ, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, लक्ष्मणराव कुटे, व्हा. चेअरमन नानासाहेब शिंदे, संचालक किसनराव सुपेकर, संजय थोरात, राजेंद्र काजळे, लक्ष्मणराव खेमनर, कचरू फड, शिवाजी जगताप, श्रीकांत गिरी, अविनाश सोनवणे, बाबुराव गुंजाळ, प्राचार्य विवेक धुमाळ, किसन वाळके, शांताराम फड, अण्णासाहेब शिंदे, कमलताई मंडलिक, ललिताताई दिघे, उबेद शेख, भाऊसाहेब गिते, गोरख कुटे, राजू गुंजाळ, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, राजेंद्र गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी आदी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरच्या सर्व सहकारी संस्था वाटचाल करत असल्याने देशातील सहकारासाठी दिशादर्शक ठरल्या आहेत. रिझर्व बँकेचे अनेक बंधने असून अमृतवाहीनी बँकेने अत्यंत गुणवत्ता पूर्ण कामकाज करत वाटचाल सुरू ठेवली आहे. संगमनेर मध्ये सहकारी बँका व पतसंस्थांचे मोठे जाळे असून सुमारे 5000 कोटींच्या ठेवी या बँक व पतसंस्थांमध्ये आहेत. ग्रामीण समृद्धी, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था या सर्वांमुळे संगमनेरची बाजारपेठ फुलली आहे. राज्यातील सर्व ब्रँडच्या बँका, पतसंस्था, विविध व्यावसायिक संगमनेर मध्ये आले आहेत हे संगमनेरच्या आर्थिक समृद्धीचे प्रतीक असल्याचेही ते म्हणाले.

चेअरमन सुधाकर जोशी म्हणाले, अमृतवाहिनी बँक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगमनेर खुर्द व आश्वी बुद्रूक येथे दोन शाखा सुरू करणार आहे. याचबरोबर बँकेने राजहंस दूध विकास योजनेअंतर्गत 750 शेतकर्‍यांना कमी दराने कर्ज दिले आहे. सातत्याने तालुक्यातील नागरिकांना मदत करताना नवनवीन योजना राबवले आहेत. मोबाईल अ‍ॅप, डेबिट कार्ड, एटीएम कार्ड अशा योजना राबवल्या आहेत. बँकेच्या सर्व सभासदांचा दोन लाख रुपयांचा अपघाती विमा काढला असून बँकेच्या सर्व कर्मचार्‍यांचा दहा लाख रुपयांचा अपघाती विमा ही काढण्यात येणार आहे. सर्वांच्या सहयोगातून आगामी वर्षात एक हजार कोटींचा व्यवसाय बँक करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी संतोष हासे, विष्णुपंत रहाटळ, बापूसाहेब टाक, स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब डांगरे, नवनाथ अरगडे, गणपतराव सांगळे, सुनीता अभंग आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

बैठकीचे नोटीस वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी यांनी केले. प्रास्ताविक चेअरमन सुधाकर जोशी यांनी केले. स्वागत बापूसाहेब गिरी यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर व्हाईस चेअरमन अ‍ॅड. नानासाहेब शिंदे यांनी आभार मानले.

अमृतवाहिनी अ‍ॅप व डेबिट कार्डचा शुभारंभ

अमृतवाहिनी बँकेने आधुनिक प्रणालीचा वापर करताना रिझर्व बँकेच्या परवानगीने स्वतःचे अ‍ॅप विकसित केले असून या अ‍ॅपचे व बँकेचे रूपे डेबिटकार्डचा शुभारंभ आ. थोरात यांच्या हस्ते झाला. या शुभारंभाच्या वेळीच बँकेच्या सर्व सभासदांच्या खात्यावर डिव्हिडंड वर्ग झाल्याचा मेसेज उपस्थितांसह तालुक्यातील सर्व सभासदांना मिळाला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com