आम्ही मगर यांच्या सोबतच - आ. पाचपुते

विरोधकांच्या वावड्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
आम्ही मगर यांच्या सोबतच - आ. पाचपुते
पाचपुते

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

नागवडे सहकारी साखर कारखाण्यात झालेले घोटाळे केशवराव मगर यांनी पुराव्यानिशी दाखविल्याने आपण त्यांना मदत करण्याचे ठरविले. मात्र आपण मगर यांच्या सोबत नसल्याच्या विरोधक वावड्या उठवत असून आम्ही निवडणुक कार्यक्रम जाहीर झाले पासून केशवभाऊ मगर यांच्या सोबतच ठाम असल्याने वावड्यांवर विश्वा न ठेवण्याचे आवाहन आ.पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

काष्टी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आ. पाचपुते बोलत होते. ते म्हणाले, आमचा नागवडे यांच्या खाजगी कारखान्याला विरोध नाही. आम्ही खाजगी कारखाने उभारताना लोकांकडून 10 कोटींचे शेअर्स आणि 10 कोटीचे कर्ज काढले तर तसेच आमच्या जमिनी, घर गहाण ठेवल्या आहेत. मात्र 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या नागवडे यांनी परभणी येथे 64 कोटीचा खाजगी कारखाना तसेच कराड येथे 1 हजार टनी गुळाचा कारखान्यासारखे 6 खाजगी संस्था कश्या विकत घेतल्या याचे उत्तर नागवडे यांनी सभासदांना द्यावे.

पुढे बोलताना आ.पाचपुते यांनी सांगितले की स्व.शिवाजीराव नागवडे आणि माझ्यात राजकीय मतभेद होते मात्र आम्ही कधीही खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले नाही. नागवडे कारखाना आमचा आहे सभासदांचा आहे तो टिकला पाहिजे ही भूमिका आहे. डीसलेरी प्रकल्प हा कारखान्याला जीवनदान देणारा प्रकल्प असून नागवडे हे डीसलेरीचे अध्यक्ष असताना मागील 8 वर्श्यापासून कारखान्यातील डीसलेरी प्रकल्प बंद कसा असा देखील आ.पाचपुते यांनी उपस्थित केला.

या पत्रकार परिषदेस नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव भाऊ मगर, जेष्ठ नेते भगवान राव पाचपुते, गणपतराव काकडे, संदीप नागवडे, अनंता पवार उपस्थित होते.

राजेंद्र नागवडे यांनी कारखान्याच्या मशनरी भंगाराच्या भावात दिल्या. सभासदांच्या कारखान्यात असलेल्या 55 कोटींच्या ठेवी राजेंद्र नागवडे हे बिनव्याजी वापरण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित करत मागील वर्षी शेतकर्‍यांच्या उसाचा दर हा एफ. आर.पी. पेक्षा 217 रुपयांनी कमी दिल्याने याचे उत्तरं नागवडे यांना या कारखान्याच्या निवडणुकीत सभासद देतील असे या वेळी माजी उपाध्यक्ष केशव मगर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com