ना पदाचा गर्व, ना सत्तेचा अहंकार

ना. आशुतोष काळे आणि कार्यकर्त्यांमधले नि:स्सीम प्रेम
ना पदाचा गर्व, ना सत्तेचा अहंकार

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

काकडी येथील प्रभाकर गुंजाळ यांनी साईबाबांना जोपर्यंत आशुतोष काळे आमदार होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा नवस केला होता. आशुतोष काळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. मात्र करोनामुळे साईमदिर बंद असल्याने चार वर्षापासून गुंजाळ अनवाणी पायांनी फिरत होते. नुकतेच करोना निर्बध हटविल्याने मंदिर सुरू झाले. 71 जोडप्यांनी सत्यनारायण पूजा करून प्रभाकर गुंजाळ यांचा नवस फेडला.

यावेळी आशुतोष काळे, चैतालीताई सत्यनारायण पूजेला बसले. त्यांनी सपत्नीक प्रभाकर गुंजाळ यांचे पाय धुवून त्यांना चांदीच्या चपला भेट दिल्या. नवस पूर्ण करताना आशुतोष व चैताली यांनी जोडीने गुंजाळ यांचे पाय धुतले. यावेळी प्रभाकर गुंजाळ यांना अश्रू रोखता आले नाहीत.

कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील प्रभाकर गुंजाळ यांनी आशुतोष काळे यांचा 2019 विधानसभा निवडणुकीत विजय व्हावा यासाठी साईबाबांना नवस केला होता. जोपर्यंत आशुतोष काळे आमदार होत नाहीत तोपर्यंत चप्पल घालणार नाही, असा संकल्प केला होता. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आशुतोष काळे यांचा विजय झाला. आशुतोष काळे आमदार झाल्यानंतर थोड्याच दिवसात करोनाचे सावट पसरले आणि लॉकडाऊनमुळे साईबाबांचे मंदिर बंद झाले.

त्यामुळे प्रभाकर गुंजाळ यांना नवस फेडता आला नाही. प्रभाकर गुंजाळ गत चार वर्षांपासून अनवाणी पायानेच फिरत होते. त्यांनी साईबाबांच्या भक्तीपोटी व आशुतोष यांच्या प्रेमापोटी पाऊस, ऊन कशाचीही पर्वा केली नाही व नवस पूर्ण केल्याशिवाय चप्पल घालणार नाही हा आपला निश्चय दृढ ठेवला. करोनाचे सावट कमी झाल्यानंतर जेव्हा मंदिर पुन्हा सुरू झाले व साईबाबा मंदिरात सत्यनारायण पूजा करण्यास सुरुवात झाली तेव्हा 71 जोडप्यांनी सत्यनारायण पूजा करून प्रभाकर गुंजाळ यांचा नवस फेडण्यात आला. यावेळी आशुतोष काळे,चैतालीताई यांच्यासह सत्यनारायण पूजेला बसले. त्यांनी सपत्नीक प्रभाकर गुंजाळ यांचे पाय धुवून त्यांना चांदीच्या चपला भेट दिल्या. आपला नवस पूर्ण करताना व आशुतोष काळे यांनी जोडीने पाय धुत असताना प्रभाकर गुंजाळ यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत.

यावेळी कार्यकर्त्याचे आपल्या नेत्यावर व नेत्याचे आपल्या कार्यकर्त्यावर असलेले प्रेम बघून उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले. एकविसाव्या शतकात आज निष्ठा, प्रेम व प्रामाणिकपणा या गोष्टी सगळीकडे स्वार्थाच्या पारड्यात वजनाने कमी भरताना दिसतात. पण काही प्रसंग असे घडतात की ज्याने पुन्हा या गोष्टींवर आपला विश्वास दृढ होतो. आज कलयुगात निष्ठा, प्रेम व प्रामाणिकपणा या गोष्टी दुय्यम नाहीत हेच यावेळी आशुतोष यांनी एक नेता म्हणून व प्रभाकर यांनी एक कार्यकर्ता म्हणून यावेळी दाखवून दिले.

Related Stories

No stories found.