कोपरगाव शहरातील भूमिगत गटार कामाच्या प्रस्तावाला गती द्या- आमदार काळे

कोपरगाव शहरातील भूमिगत गटार कामाच्या प्रस्तावाला गती द्या- आमदार काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

विकास कामांबरोबर नागरिकांचे आरोग्य देखील महत्वाचे आहे. त्यामुळे कोपरगाव शहरासह हद्दवाढ झालेल्या भागात भूमिगत गटारीचे प्रस्ताव तयार करण्याच्या कामाला गती द्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांची बैठक पार पडली. बैठकीला नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, सहाय्यक नगर रचनाकार दिपक बडगुजर, प्रकल्प सल्लागार साबळे, वास्तूरचना प्रकल्प सल्लागार गुरसळ, काळे कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, हाजी मेहमुद सय्यद, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, फकीर कुरेशी, दिनकर खरे, कृष्णा आढाव, सचिन गवारे, अनिल सोनवणे आदी उपस्थित होते.

आ. काळे यांनी उपस्थितीत अधिकार्‍यांना मार्गदर्शन करतांना सांगितले, गत दोन वर्षापासून जीवघेण्या करोना महामारीचा सामना करीत आहोत. महाविकास आघाडी सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार केलेल्या उपाय योजनांमुळे तालुक्यात करोनावर नियंत्रण मिळविता आले. रुग्णसंख्या कमी झाली आहे. हि समाधानाची बाब असली तरी करोना संकट पूर्णपणे टळलेले नाही. वातावरण बदलानुसार होणारे साथीचे आजार व उघड्या गटारींमुळे वाढणारी रोगराई चिंतेचा विषय ठरू शकते.

त्यासाठी शहरातील जवळपास सर्वच गटारी भूमिगत होणे गरजेचे आहे. तसेच भविष्यातील काळजी घेण्याच्या दृष्टीने हद्दवाढ झालेल्या भागात देखील भूमिगत गटारी काळाची गरज होऊन बसली आहे. त्यासाठी नगरपरिषदेने शहर व हद्दवाढ झालेल्या भागात भूमिगत गटारीच्या निर्मितीसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या कामाला गती देवून तातडीने प्रस्ताव तयार करा. सदर प्रस्तावांना महाविकास आघाडी सरकारकडून मंजुरी मिळवून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com