ऊस वाहतुकीसाठी बदलत्या आव्हानाला सामोरे जावे : आ. आशुतोष काळे

ऊस वाहतुकीसाठी बदलत्या आव्हानाला सामोरे जावे : आ. आशुतोष काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकर्‍यांना उन्हाळ्यात

देखील शेतीसाठी आवर्तने मिळाल्यामुळे यावर्षी मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध असला तरी अडचणी व नवीन आव्हाने देखील येत असतात. यावर्षी इतर अडचणी सोबतच जागतिक करोना संकटाचे सावट असल्यामुळे काळजी घ्यावी लागणार असून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी गोदावरी खोरे व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीने बदलत्या आव्हानाला सामोरे जावे, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी केले.

गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीची व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीची सर्वसाधारण सभा कंपनीचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली गौतम सहकारी बँकेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, चालू गळीत हंगामात कार्यक्षेत्रामध्ये मोठ्याप्रमाणावर ऊस उपलब्ध आहे.

व्यवसाय करण्याची चांगली संधी आहे. करोना पार्श्वभूमीवर सर्व ट्रक चालक व मालकांनी काळजी घ्यावी. सॅनिटायझर व मास्कचा वापर करून कंपनीस व शेतकी खात्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले. प्रास्तविक गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे यांनी केले.

सूत्रसंचालन जनरल मॅनेजर सोपानराव डांगे यांनी केले तर आभार संचालक विजय जाधव यांनी मानले. याप्रसंगी संचालक छबुराव आव्हाड, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक विश्वासराव आहेर, ज्ञानदेव मांजरे, सुनील शिंदे, काकासाहेब जावळे, कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, गौतम केनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर भिकाजी सोनवणे, कारखान्याचे जनरल मॅनेजर सुनील कोल्हे व सभासद उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com