अपयशही पचवायला शिकले पाहिजे : आ. आशुतोष काळे

अपयशही पचवायला शिकले पाहिजे : आ. आशुतोष काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

हार-जीत हा कोणत्याही खेळाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे कोणत्याही स्पर्धात्मक खेळात यशाची चव चाखतांना अपयशही पचवायला शिकले पाहिजे असा सल्ला आ. आशुतोष काळे यांनी दिला.

कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथे जय बजरंग स्पोर्ट क्लबच्या यांच्या वतीने आयोजित डे नाईट ढकली व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानंदचे माजी संचालक राजेंद्र जाधव, विजयराव जाधव, भास्करराव बगाटे, वसंतराव देशमुख, बाळासाहेब कासार, प्रशांत मोरे, अशोकराव जाधव, रोहिदास शिंदे, भाऊसाहेब शिंदे, विजयकुमार जाधव,अण्णासाहेब बगाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. काळे म्हणाले, खेळात यश-अपयश येणारच. यशाचे वाटेकरी अनेक असतात मात्र अपयशाची जबाबदारी कोणीच घेत नाही. त्यामुळे अपयश आल्यावर आपल्या सभोवताली असलेली गर्दी देखील कमी होते. अशावेळी न डगमगता यश मिळविण्याचा खेळाडूंनी पुन्हा प्रयत्न केल्यास हमखास यश मिळत. त्यामुळे अपयश आले तरी यश मिळविण्यासाठी अपयश पचवायला शिका असे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

यावेळी भाऊसाहेब जाधव, ठकणराव शिंदे, शिवाजीराव गायकवाड, विलास कासार, सुनील बेंद्रे, प्रल्हाद थोरात, सिताराम जाधव, दिलीप गायकवाड, किशोर जाधव, अण्णासाहेब शिंदे, राजेंद्र वाबळे, साहेबराव जाधव, जगदीश जाधव, भीमराज गायकवाड, सरपंच रमेशराव आहेर, उपसरपंच मोहन कासार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक महेश काळे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ खेळाडू व व्हॉलीबॉल शौकीन प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वारी पुलाचा प्रश्न प्रलंबित होता. अडचणी दूर करण्यात यश मिळाल्यामुळे वारी पुलासाठी 20 कोटी रुपये निधी आणला. सुरेगाव-सांगवी पुल करणार असल्याचा शब्द दिला आहे. वारी गावच्या पुलासाठी रस्त्याची दरजोन्नती करण्यात यश आले त्याच धर्तीवर सुरेगाव सांगवी पूल होण्यासाठी कोळपेवाडी- कोळगावथडी- सुरेगाव-सांगवी या रस्त्याची दरजोन्नती करून सुरेगाव सांगवी पूल निर्मितीसाठी प्रयत्नशील आहे.

- आ. आशुतोष काळे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com