निकालाची परंपरा कायम ठेवा, विकासाचा वारू थांबू देणार नाही - आ. आशुतोष काळे

निकालाची परंपरा कायम ठेवा, विकासाचा वारू थांबू देणार नाही - आ. आशुतोष काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

2016 च्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीपासून ते 2019 ची विधानसभा निवडणूक व आजतागायत प्रत्येक निवडणुकीत माझ्यावर विश्वास दाखविला. त्या विश्वासाला पात्र राहून विकासाचे कोणतेच प्रश्न अनुत्तरीत ठेवणार नाही. आजवरच्या निवडणूक निकालाची परंपरा यापुढेही कायम ठेवा, विकासाचा वारू थांबू देणार नाही, असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी कोळपेवाडी येथे एका कार्यक्रमात केले.

सुरेगाव,कोळपेवाडी ग्रामस्थांच्यावतीने साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती पोर्णिमा जगधने होत्या. यावेळी उपसभापती अर्जुनराव काळे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, राजेंद्र मेहेरखांब, अशोकमामा काळे, बबनराव कोळपे, अनिल कदम, श्रावण आसने, वैशाली आभाळे, संभाजीराव काळे उपस्थित होते.

आ.आशुतोष काळे म्हणाले, प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. मतदार संघाच्या विकासासाठी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे सहकार्य मिळत असून गोदावरी कालव्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे. चालू वर्षी 55 कोटी रुपये निधी दुरुस्तीसाठी उपलब्ध झाला असून पुढील वर्षी मिळणार्‍या 100 कोटींच्या निधीतून गोदावरी कालव्यांची मोठ्या प्रमाणात कामे होणार आहेत. येत्या 5 वर्षात गोदावरी कालव्यांची 500 कोटीची कामे करून घेणार असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com