संवत्सरला 30 बेडचे ग्रामीण रुग्णालय व कर्मचारी वसाहतीसाठी 22.78 कोटी निधी मंजूर - ना. काळे

संवत्सरला 30 बेडचे ग्रामीण रुग्णालय व कर्मचारी वसाहतीसाठी 22.78 कोटी निधी मंजूर - ना. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना पुन्हा एकदा यश मिळाले असून संवत्सर येथे 30 बेडचे ग्रामीण रुग्णालय व कर्मचारी वसाहतीसाठी महाविकास आघाडी सरकारने 22.78 कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली.

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयास महाविकास आघाडी सरकारने उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन 100 बेडचे उपजिल्हा रुग्णालय म्हणून मंजुरी देखील दिली आहे. तसेच माहेगाव देशमुख या ठिकाणी देखील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. पूर्व भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा जवळच्या गावात उपलब्ध व्हाव्यात या उद्देशातून तिळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास मंत्रालय स्तरावरील मान्यता मिळावी यासाठी ना. आशुतोष काळे प्रयत्न करीत आहेत.

तालुक्याच्या पूर्व भागातील मोठी लोकसंख्या व विस्ताराने मोठे असलेल्या संवत्सर व लगतच्या पंचक्रोशीतील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ग्रामीण रुग्णालय गरजेचे होते. त्या प्रयत्नांना यश मिळून या ग्रामीण रुग्णालयासाठी 17.15 कोटी, कर्मचारी वसाहतीसाठी 5.63 कोटी असा एकूण 22.78 कोटी निधीस महाविकास आघाडी सरकारने मंजुरी दिली आहे. त्याबद्दल ना. आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले आहे.

मतदार संघातील लोकसंख्येचा विचार करता रुग्णांना मिळणारी आरोग्य सुविधा लोकसंख्येच्या प्रमाणात कमी होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील नागरिकांना कोपरगावमध्ये सुसज्ज रुग्णालय उभारणार असे वचन आपण दिले होते. दिलेल्या वचनाची पूर्तता करून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयास 100 बेडचे उपजिल्हा रुग्णालयास प्रशासकीय मान्यता मिळवून 28.84 कोटी निधी देखील आणला आहे. नुकतेच संवत्सरला 30 बेडचे ग्रामीण रुग्णालय व कर्मचारी वसाहतीसाठी महाविकास आघाडी सरकारने 22.78 कोटी निधी मंजूर केल्यामुळे कोपरगाव मतदार संघ आरोग्याच्या बाबतीत लवकरच स्वयंपूर्ण होईल.

- ना. आशुतोष काळे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com