प्रश्न कुणामुळे सुटले हे जनतेला माहिती - आ. आशुतोष काळे

प्रश्न कुणामुळे सुटले हे जनतेला माहिती - आ. आशुतोष काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

सत्ता असतांना नागरिकांची कामे करता आली नाही. आता नागरिकांचे जे काही प्रश्न सुटत आहे ते प्रश्न आमच्यामुळेच सुटत असल्याचे भासवत श्रेय घेण्यासाठी काहींची धडपड सुरु आहे. मात्र आपले प्रश्न कुणामुळे सुटले हे जनता जाणून आहे त्यामुळे कुणीही श्रेय घेण्यासाठी पुढे आले तरी मला फरक पडणार नाही. नागरिकांचे प्रश्न सुटणे माझ्यासाठी महत्वाचे आहे. असा टोला माजी आ.स्नेहलता कोल्हे (Former MLA Snehlata Kolhe) यांचे नाव न घेता आ. काळे (MLA Ashutosh Kale) यांनी लगावला.

तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या (Nandur Madhyameshwar fast canals) वितरिका क्र. 1 व 2 च्या भूसंपादनाच्या मोबदल्याचा प्रश्न आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी निवडून येताच केलेल्या पाठपुराव्यातून मार्गी लागला असून या प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना भरपाई (Compensation to project affected farmers) मिळण्यास सुरुवात झाली आहे. मागील महिन्यात लौकी येथील जमिनी अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना यापूर्वी 61 लाख 87 हजार रुपयांची भरपाई मिळाली आहे. व नुकतीच खोपडी येथील एकूण 22 प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना 2 कोटी 17 लाख रुपयांची भरपाई मिळाली आहे.

त्या भरपाईचे धनादेश आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांच्या हस्ते प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना देण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, पंचायत समिती सदस्य मधुकरराव टेके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, राजेंद्र खिलारी, शिवाजी शेळके, गणेश घाटे, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब वारकर, बाबासाहेब नवले, नांदूर मधमेश्वर कालवा उपविभागाचे उपविभागीय अभियंता डी.पी. पाटील, शाखा अभियंता एस.पी. पवार, शाखा अधिकारी बी.आर. वारकर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com