आरोग्य केंद्राची दुरुस्तीची कामे दर्जेदार व्हावी

आ. आशुतोष काळे : एन.आर.एच.एम.च्या अधिकार्‍यांना सूचना
आरोग्य केंद्राची दुरुस्तीची कामे दर्जेदार व्हावी

कोपरगाव|प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यात सुरू असलेल्या आरोग्य केंद्रांतून नागरिकांना चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा मिळावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुरू असलेली दुरुस्तीची कामे दर्जेदार झाली पाहिजेत, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी एन.आर.एच.एम.च्या अधिकार्‍यांना दिल्या.

एन.आर.एच.एम.च्या अधिकार्‍यांसमवेत आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच पंचायत समिती कोपरगाव येथे बैठक घेतली. या बैठकीत बोलताना आमदार आशुतोष म्हणाले की, प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा कणा आहे. त्यादृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती करताना ज्या गोष्टींची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे अशा गोष्टींच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे.

ग्रामीण भागात ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांची आवश्यकता आहे त्याबाबत सविस्तर अहवाल तयार करून एन.आर.एच.एम.च्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रांना अजूनही काय सुविधा देता येतील यासाठी प्रयत्न करावा व शक्य असल्यास दुरुस्तीच्या आराखड्यात बदल करावा. प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती करताना कामाचा दर्जा उच्च असावा. दुरुस्ती कामात केलेली दिरंगाई सहन केली जाणार नाही.

अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी एन.आर.एच.एम.च्या अधिकार्‍यांना यावेळी दिल्या. या बैठकीसाठी सभापती सौ.पोर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुनराव काळे,जी.प.सदस्य सुधाकर दंडवते, सोनाली रोहमारे, सोनाली साबळे, पं.स.सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने,अनिल कदम, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम, जिनिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, सुधाकर होन, प्रशांत वाबळे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, उपअभियंता जी.पी. काळे, कनिष्ठ अभियंता अजीज शेख, कार्यकारी अभियंता अंकुश पाटील, उपभियंता उत्तमराव पवार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते आदी उपस्थित होते.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com