शासनाच्या योजनांचा लाभ सभासदांपर्यंत पोहचवावा - आ.आशुतोष काळे

शासनाच्या योजनांचा लाभ सभासदांपर्यंत पोहचवावा -  आ.आशुतोष काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

महाविकास सरकारने शेतकर्‍यांच्या बाबतीत अनेक महत्वाचे निर्णय घेऊन शेतकर्‍यांना दिलासा देण्याचे काम केलेले आहे. त्याचप्रमाणे सहकारी सोसायटीच्या माध्यमातून देखील शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहे. या योजनांचा लाभ सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी शेतकरी सभासदांपर्यंत पोहचवावा, असे आवाहन साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

तालुक्यातील संस्था पातळीवर 100 टक्के वसुली झालेल्या के.बी. आबक कृषी फलोद्यान सह.संस्था संवत्सर, शिलेदारवाडी संस्था. शिलेदारवाडी, श्रीकृष्ण संस्था पोहेगाव, तळेगाव मळे संस्था तळेगाव मळे, शनेश्वर महाराज संस्था तळेगाव मळे, महेश्वर संस्था, येसगाव, चां.बा. कोळपे संस्था कोळपेवाडी, उमरावती संस्था देर्डे कोर्‍हाळे, लक्ष्मी संस्था चांदेकसारे, कैलासगिरी संस्था कान्हेगाव, गोधेगाव नं 1 वि.का. संस्था गोधेगाव आदी सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते जिल्हा सहकारी बँक कोपरगाव येथे करण्यात आला. ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांना 3 लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

सलग दोन वर्षे करोना संसर्गाच्या संकटामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी महाविकास आघाडी सरकार राबवीत असलेल्या योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी सोसायटी पदाधिकार्‍यांनी प्रयत्न करून आपल्या संस्थांचे हित जोपासावेे. यावेळी अ‍ॅड. आर.टी. भवर, एम.टी. रोहमारे, सहाय्यक निबंधक राजेंद्र रहाणे, तालुका विकास अधिकारी अविनाश काटे, ऑफिस सुपरीटेंडेंट रवींद्र आवारे, विशेष वसुली अधिकारी अशोक लोहकरे, नोडल ऑफिसर सुरेश शिंदे आदींसह संस्थांचे सचिव, पदाधिकारी व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com